‘फॅबटेक’मध्ये ऑनलाइन डी. फार्मसी प्रवेश प्रक्रिया सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:15 AM2021-07-12T04:15:19+5:302021-07-12T04:15:19+5:30
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रवेश प्रक्रिया व अर्ज पडताळणीसाठी विद्यार्थ्यांसमोर दोन पर्याय ठेवले आहेत. प्रथम पर्यायात सुविधा केंद्रावर जाऊन अर्ज भरणे, ...
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रवेश प्रक्रिया व अर्ज पडताळणीसाठी विद्यार्थ्यांसमोर दोन पर्याय ठेवले आहेत. प्रथम पर्यायात सुविधा केंद्रावर जाऊन अर्ज भरणे, पडताळणी व निश्चिती करणे, दुसऱ्या पर्यायात इंटरनेटचा वापर करून सुविधा केंद्र निवडणे, पडताळणी करून निश्चिती करणे, बारावी विज्ञान उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे डी. फार्मसी प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज १० जुलै ते २ ऑगस्टपर्यंत स्वीकारले जातील. यासाठी विद्यार्थ्यांचे ऑनलाइन रजिस्ट्रेशन व मूळ कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. विद्यार्थ्यांनी सर्व सत्य कागदपत्रे व दोन प्रतीत झेरॉक्स सोबत घेऊन येणे आवश्यक आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. संजय बैस यांनी दिली. अधिक माहितीसाठी प्रा. एस. एम. काझी, प्रा. श्रीनिवास माने, प्रा. अमोल पोरे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.