ग्रामीण भागातील ऑनलाईन शिक्षण नुसता फार्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:15 AM2021-06-30T04:15:09+5:302021-06-30T04:15:09+5:30
माढा तालुक्यात सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा व कॉलेजमध्ये ऑनलाइनद्वारे शिक्षणप्रणाली सुरू झालेली आहे. यात सर्व शिक्षकही ...
माढा तालुक्यात सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा व कॉलेजमध्ये ऑनलाइनद्वारे शिक्षणप्रणाली सुरू झालेली आहे. यात सर्व शिक्षकही मोठ्या उत्साहात सहभागी झाले आहेत. परंतु विद्यार्थ्यांना याचा फायदा होत नाही. शहरांपेक्षा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे तर या शिक्षणाकडे लक्षच नसल्याचे दिसून येत आहे.
ग्रामीण भागातील अनेक शिक्षक हे सध्या आपल्या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी स्थानिक स्तरावर सर्व प्रयोग करीत आहेत. परंतु त्यालाही प्रतिसाद कमी मिळत आहे. पालकांतूनही याला प्रतिसाद अत्यल्पच मिळत आहे. त्यामुळे अनेक शिक्षक हे व्हाॅट्स ॲपद्वारे ग्रुप, ऑनलाईन तासिकाद्वारे किंवा पालकांना शाळेत बोलावून स्वाध्यायिका देणे अशा प्रकारे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
----
शहरांपेक्षा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा भौतिक विकास होणार नाही. शिक्षक व विद्यार्थी या नात्यातच एक वेगळेपण असते. शिक्षक हाताला धरून आपल्या विद्यार्थ्यांना मुळाक्षरे शिकवत असतो. त्यामुळे त्या शिक्षणाची सर कशातही येणार नाही. परंतु याला दुसरा पर्यायही नाही.
- प्रा. डॉ. राजेंद्र दास, ज्येष्ठ साहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ, कुर्डूवाडी
----
माढा तालुक्यातील सर्व शाळेत निम्मे शिक्षक उपस्थित राहून ऑनलाईनद्वारे विद्यार्थ्यांना सध्या शिकवीत आहेत. यात अनेक अडचणी येत आहेत, परंतु विद्यार्थ्यांना मूळ शिक्षणप्रणालीत आणण्याचे काम विभागकडून सुरू आहे. विद्यार्थ्यांबरोबर त्यांच्या पालकांनी देखील या काळात लक्ष देणे आवश्यक आहे.
- मारुती फडके, गटशिक्षणाधिकारी, माढा
----
कोट-
माझी दोन मुले प्राथमिक व हायस्कूल शाळेत शिकत आहेत. ऑनलाईन शिक्षणाकडे मुले लक्ष देत नाहीत. ती एकलकोंडी बनत असून मोबाईलवरील गेम खेळण्याकडेच त्यांचा कल जास्त असल्याचे दिसून येत आहे. कोरोनामुळे याला पर्यायही काही नाही.
- विलास वेळेवर, पालक, लऊळ.
----