ऑनलाईन शिक्षण असून खोळंबा नसून घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:16 AM2021-07-18T04:16:49+5:302021-07-18T04:16:49+5:30

इयत्ता पहिली पासून सर्वच इयत्तांचे ऑनलाईन शिक्षण चालू आहे. परंतु यामध्ये लहान वयोगटातील विद्यार्थी व त्यांचे पालक यांचे जास्त ...

Online education is a scam, not a trap | ऑनलाईन शिक्षण असून खोळंबा नसून घोटाळा

ऑनलाईन शिक्षण असून खोळंबा नसून घोटाळा

Next

इयत्ता पहिली पासून सर्वच इयत्तांचे ऑनलाईन शिक्षण चालू आहे. परंतु यामध्ये लहान वयोगटातील विद्यार्थी व त्यांचे पालक यांचे जास्त नुकसान होत आहे. शाळा पालकांकडून फी मिळावी म्हणून ऑनलाईन शिक्षण देत आहेत. परंतु यामुळे लहान वयोगटातील विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाईम, त्यांची मानसिकता, पालकांचा वेळ, ऑनलाईन शिक्षणासाठी आवश्यक असणारी डिजिटल साधने किती विद्यार्थ्यांकडे उपलब्ध आहेत याचा विचार करताना संस्था दिसत नाहीत. ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाईम वाढल्याने मुलांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे. मुले मोबाईलशी खेळत बसतात.

---

ग्रामीण भागात इंटरनेटचा अभाव

ग्रामीण भागातील विद्यार्थ्याचे पालक डिजिटल उपकरणे विकत घेऊ शकत नाहीत आणि त्यांना दर महिन्याला लागणारा इंटरनेटचा खर्च परवडत नाही. शिवाय इंटरनेट सुविधा देखील सहजासहजी उपलब्ध होताना दिसत नाही, तसेच शिक्षक आणि विद्यार्थी यांचा प्रत्यक्ष संपर्क होत नसल्याने विद्यार्थ्यांच्या कृतिशीलतेला वाव मिळत नाही अशी मुले शिक्षणापासून वंचित राहत आहेत, असे पालकांचे म्हणणे आहे.

----

ऑनलाईन शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना वर्गात जाऊन शिकण्याचा आनंद मिळत नाही. शिक्षक आणि विद्यार्थी यांचे संवाद होत नाही. यामध्ये स्वयं अध्ययन महत्त्वाचे आहे. मुलांच्या मानसिकतेचा ही विचार होणे गरजेचे आहे.

-डॉ .स्वाती दळवी पालक

---

ऑनलाईन शिक्षणासाठी आवश्यक असलेली साधने उपलब्ध करू न शकणाऱ्या पालकांची पंचवीस ते तीस टक्के विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत.

-नारायण भानवसे, चेअरमन- महात्मा फुले विद्यालय, टेंभुर्णी.

---

Web Title: Online education is a scam, not a trap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.