महिला व नवजात शिशु व जिल्हा रुग्णालयाचे आरोग्य मंत्री सावंत यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन
By रूपेश हेळवे | Published: March 13, 2024 05:41 PM2024-03-13T17:41:15+5:302024-03-13T17:42:00+5:30
जिल्हा रुग्णालय आणि महिला व नवजात शिशु रुग्णालयाला २०१६ मध्ये मान्यता मिळाली होती.
रुपेश हेळवे,सोलापूर : जिल्हा रुग्णालय आणि महिला व नवजात शिशु रुग्णालयाला २०१६ मध्ये मान्यता मिळाली होती. पण हे पूर्ण होण्यासाठी आठ वर्ष लागले. पण याचे लोकार्पण सोहळ्यानंतर याचा स्थानिकांना लाभ होईल. शिवाय हॉस्पिटलमधील पदे रिक्त पदे भरून सोमवार पासून सेवेत दाखल होईल, असे मत व्यक्त करत आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी ऑनलाईन दोन्ही रुग्णालयाचे लोकार्पण केले.
सोलापुरातील गुरू नानक चौक परिसरात शंभर खाटांचे महिला, शिशु रुग्णालय व जिल्हा रुग्णालय बांधण्यात आले आहे. याचे उद्घाटन समयी आरोग्यमंत्री तानाजी सावंत बोलत होते. यावेळी खासदार डॉ. जय सिध्देश्वर महास्वामी, जिल्हाधिकारी कुमार अशीर्वाद, सीईओ मनिषा आव्हाळे, आरोग्य उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने, अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे, आरएमओ डॉ. श्रीकांत कुलकर्णी, शिवसेनेचे संपर्कप्रमुख शिवाजी सावंत, सोलापूर शिवसेना प्रमुख अमोल शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.