‘कोविड १९ द गेम चेंजर’ विषयावर ऑनलाइन राज्यस्तरीय पोस्टर स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:16 AM2021-06-22T04:16:00+5:302021-06-22T04:16:00+5:30

स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे इतर विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांनीही यात सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाचे आयोजन ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले. उद्घाटन प्रा. ...

Online state level poster competition on 'Covid 19 The Game Changer' | ‘कोविड १९ द गेम चेंजर’ विषयावर ऑनलाइन राज्यस्तरीय पोस्टर स्पर्धा

‘कोविड १९ द गेम चेंजर’ विषयावर ऑनलाइन राज्यस्तरीय पोस्टर स्पर्धा

Next

स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे इतर विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांनीही यात सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाचे आयोजन ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले. उद्घाटन प्रा. डॉ. ए. एम. देशमुख, अध्यक्ष, मायक्रोबायलॉजी सोसायटी, इंडिया यांच्या हस्ते झाले. त्यांनी कोरोनावर माहितीपर व्याख्यान दिले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एच.एस.पाटील होते.

या स्पर्धेत प्रथम स्नेहा नलवडे, द्वितीय स्वेता जाधव, तृतीय भूमिती माने व विशाखा शिराळकर या पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचा ऑनलाइन सत्कार करण्यात आला. यावेळी बार्शी शिक्षण प्रसारक मंडळाच्या कोषाध्यक्षा वर्षा झाडबुके यांनी गुणवंतांचे अभिनंदन केले.

या कार्यक्रमाचे आयोजन एसबीझेडएम, मायक्रोबायोलॉजी विभागप्रमुख अरुषा नंदीमठ यांनी केले होते. डॉ. नमिता डोईफोडे आणि प्रवीण मस्तुद यांनी सहकार्य केले.

----

Web Title: Online state level poster competition on 'Covid 19 The Game Changer'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.