मोहोळ तालुक्यातील झेडपी शाळांचे होणार ऑनलाईन सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:19 AM2020-12-08T04:19:32+5:302020-12-08T04:19:32+5:30
याबाबत तालुक्यातील सर्व शिक्षकांची ऑनलाईन बैठक घेण्यात आली. ग्यान प्रकाश फाउंडेशनमार्फत ही चाचणी घेण्यात येणार आहे. चाचणीसाठी सर्व पालकांना ...
याबाबत तालुक्यातील सर्व शिक्षकांची ऑनलाईन बैठक घेण्यात आली. ग्यान प्रकाश फाउंडेशनमार्फत ही चाचणी घेण्यात येणार आहे. चाचणीसाठी सर्व पालकांना एक दिवस आधी लिंक दिली जाणार आहे. या चाचणीसाठी पालकांनी मुलांना मोबाईलवरील दिलेली लिंक ९ तारखेला जॉईन करून द्यायची आहे.
कसे आहे हे सर्वेक्षण व चाचणी
ही चाचणी भाषा, गणित व इंग्रजी या तीन विषयांची होणार आहे. ती प्रत्येकी १० गुणांची असेल. दिवसभरात कधीही चाचणी सोडवता येईल. प्रश्न सोपे व बहुपर्यायी असतील. प्रश्नाखाली पर्याय असून उपलब्ध पर्यायामधून योग्य उत्तरावर क्लिक करावे. १० उत्तरे निवडल्याशिवाय चाचणी पूर्ण होणार नाही. विद्यार्थ्यांनी स्वतः उत्तरे शोधावीत. त्यांना पालकांनी मदत करू नये. ज्या मुलांजवळ स्मार्ट फोन नाहीत. त्यांनी नातेवाईक, शेजारी किंवा गावातील मुलांच्या मोबाईलवरून चाचणी द्यावी. पालकांनी विद्यार्थ्यांना मोबाईल उपलब्ध करुन द्यावा. यासाठी गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी मल्लिनाथ स्वामी, विकास यादव, ग्यान फाउंडेशनचे लक्ष्मण मिडगुले, सचिन भांबरे, चिंतामणी पवार हे प्रयत्नशील आहेत.
कोट :::::::::
विद्यार्थी व शिक्षक किंवा शाळेचे मूल्यमापन करावे हा याचा उद्देश नाही. कोरोनाच्या या स्थितीत विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात कसे आहेत. त्यांची अध्ययन स्थिती कशी आहे. हे पाहण्यासाठी हे सर्वेक्षण आहे. स्मार्ट फोनअभावी मुले वंचित राहू नये, यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
- क्रांती कुलकर्णी
समन्वयक, ग्यान फाउंडेशन