रुग्णालयात फक्त १ हजार ८९६ जणांवर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:23 AM2020-12-06T04:23:49+5:302020-12-06T04:23:49+5:30

महापालिका आरोग्य विभागाने ७९६ जणांचे अहवाल जाहीर केले. यात केवळ १४ जण पॉझिटिव्ह आले आहेत तर एकाचाही मृत्यू झालेला ...

Only 1,896 people were treated at the hospital | रुग्णालयात फक्त १ हजार ८९६ जणांवर उपचार

रुग्णालयात फक्त १ हजार ८९६ जणांवर उपचार

Next

महापालिका आरोग्य विभागाने ७९६ जणांचे अहवाल जाहीर केले. यात केवळ १४ जण पॉझिटिव्ह आले आहेत तर एकाचाही मृत्यू झालेला नाही. अशाप्रकारे शहरातील रुग्णसंख्या १० हजार ५०४ इतकी झाली असून, मृत्यूचा आकडा ५६७ आहे. आतापर्यंत ९ हजार ५२५ जण कोरोनामुक्त झाले असून, फक्त ४१२ जणांवर उपचार सुरू आहेत.

जिल्हा आरोग्य विभागाने केलेल्या २ हजार ८६१ चाचण्यांत १५१ जण पॉझिटिव्ह आले आहेत, तर तीन जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सांगोला तालुक्यातील शिवणे येथील ६१ वर्षीय व्यक्ती, मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील ६८ तर माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथील ६० वर्षांच्या व्यक्तीचा समावेश आहे. अशाप्रकारे ग्रामीणमधील एकूण रुग्णसंख्या ३६ हजार १६१ इतकी झाली असून, त्यातील १ हजार ५३ जणांचा मृत्यू झालेला आहे. १ हजार ५७४ जणांवर उपचार सुरू असून, आतापर्यंत ३३ हजार ५३४ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

४ लाख ६३ हजार चाचण्या

कोरोनाची साथ सुरू झाल्यापासून जिल्ह्यात ४ लाख ६३ हजार ८९३ चाचण्या घेण्यात आल्या आहेत. या काळात घरात ३ लाख ५४ हजार ६६६ तर संस्थात्मक २ लाख ६१ हजार ३१३ लोकांना वेगळे ठेवण्यात आले होते. दिवाळीनंतर चाचण्या वाढविण्यात आल्या असून, पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Only 1,896 people were treated at the hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.