सहकारमंत्र्यांच्या सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत फक्त वीस टक्के शेतकºयांनाच मिळाला कर्जमाफीचा लाभ, ग्रीन यादीत ६५ हजार शेतकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 02:33 PM2018-02-06T14:33:02+5:302018-02-06T14:33:57+5:30
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ६ : जिल्ह्यातील कर्जदार ४ लाख ३० हजार शेतकºयांपैकी आतापर्यंत ८३ हजार ३८३ शेतकºयांनाच कर्जमाफी मिळाली असून, एकूण कर्जदार शेतकºयांचा विचार केला असता कर्जमाफीचा फायदा मिळालेल्या शेतकºयांची टक्केवारी २० टक्क्यांच्या जवळपास आहे. ‘ग्रीन’ ‘यलो’ व मिसमॅच यादीतील शेतकºयांची संख्या अडीच लाखांपर्यंतच जाते. यामध्ये ग्रीन यादीत ६५ हजार ५०० शेतकरी आहेत. कर्जमाफीच्या प्रतिक्षेतील शेतकºयांची संख्या एकलाखापर्यंत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून कर्जमाफीची प्रक्रिया अगदी संथगतीने सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत जिल्हा बँकेच्या ५१ हजार ७७५ व राष्टÑीय बँकांच्या ३१ हजार ६०८ अशा एकूण ८३ हजार ३८३ शेतकºयांच्या बँक खात्यावर ४५१ कोटी ५६ लाख ३८ हजार ६९९ रुपये जमा झाले आहेत. शासनाने सर्वप्रथम ग्रीन यादीला प्राधान्य दिले होते. या ग्रीन यादीत जिल्हा मध्यवर्ती बँक व राष्टÑीय बँकांचे एक लाख ४८ हजार ८८३ शेतकºयांचा समावेश होता. ही यादी बँकांनी तपासून शासनाकडे पाठवली होती. त्यापैकी ८३ हजार ३८३ शेतकºयांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत. यामध्ये दीड लाखापर्यंतचे थकबाकीदार, नियमित पैसे भरणारे व दीड लाखावरील थकबाकीदार शेतकºयांचा समावेश आहे.
-----------------------------
चार लाख ३० हजार शेतकरी कर्जदार...
च्जिल्हा मध्यवर्ती बँकेचे दोन लाख २० हजार व राष्टÑीय बँकेचे दोन लाख १० हजार कर्जदार शेतकरी असल्याचे सांगण्यात आले. कर्जदार चार लाख ३० हजार शेतकºयांपैकी २० टक्के शेतकºयांनाच आतापर्यंत कर्जमाफी मिळाली असून यलो व मिसमॅच यादीतील पात्र शेतकºयांची संख्या पाहता जिल्ह्यातील ५० टक्क्यांपेक्षा कमीच शेतकºयांना कर्जमाफी होईल, असे आकडेवारी सांगते.
च्जिल्ह्यात मागील वर्षीच्या आकडेवारीनुसार एकूण ६ लाख ६७ हजार शेतकरी असून त्यापैकी ५२ हजार शेतकरी हे १० आर पेक्षा कमी क्षेत्र असल्याने कर्ज घेण्यासाठी अपात्र आहेत.
----------------------
अडीच लाखांपैकी किती पात्र?
जिल्ह्यातील ‘ग्रीन’ यादीतील एक लाख ४८ हजार ८८३ शेतकरी कर्जमाफीला पात्र झाले. ‘यलो’ यादीतील जिल्हा बँकेच्या ११ हजार १४० पैकी अवघे ३२३२ शेतकरी पात्र झाले. राष्टÑीय बँकांची ‘यलो’ यादी जिल्हा बँकेपेक्षा कमी आहे. ‘मिसमॅच’मधील ९४ हजार ४६४ पैकी तपासणीत किती पात्र होतील,त्यावर कर्जमाफीला पात्र असलेल्या शेतकºयांची संख्या अवलंबून आहे.
--------------------
- जिल्हा बँकेला आलेल्या ‘यलो’ यादीतील ११ हजार १४० शेतकºयांपैकी तपासणीत पात्र झालेल्या ३२३२ शेतकºयांचीही यादी शासनाकडेच कर्जमाफीसाठी पाठविली आहे. राष्टÑीय बँकांच्या ‘यलो’ यादीची आकडेवारी उपलब्ध नाही च्कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज भरलेल्या परंतु बँक व शेतकºयांच्या अर्जातील माहिती जुळत (‘मिसमॅच’) नसलेल्या जिल्हा बँकेच्या ४७ हजार ११ व राष्टÑीय बँकेच्या ३८ हजार ६५७ अशा ९४ हजार ४६४ शेतकºयांची तपासणी सुरू आहे.