नीरा खोऱ्यात ५२ टक्केच पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:21 AM2021-04-06T04:21:29+5:302021-04-06T04:21:29+5:30
मार्चपासून धरणांतून उन्हाळी आवर्तनाला सुरुवात झाली आहे. नीरा नदीच्या डाव्या कालव्यातून ८२७ तर उजव्या कालव्यातून १५५० क्युसेकने विसर्ग सुरू ...
मार्चपासून धरणांतून उन्हाळी आवर्तनाला सुरुवात झाली आहे.
नीरा नदीच्या डाव्या कालव्यातून ८२७ तर उजव्या कालव्यातून १५५० क्युसेकने विसर्ग सुरू आहे. दोन महिन्यांसाठी हे आवर्तन असणार आहे. नीरा खोऱ्यातील चारही धरणात उपलब्ध असलेल्या २५.८६ टीएमसी पाण्याचे उन्हाळी हंगामासाठी नियोजन केले आहे. भाटघर, नीरा देवघर, वीर आणि गुंजवणी या धरणांतील उपलब्ध असलेल्या पाण्याचे नियोजनानुसार उन्हाळी आवर्तन सुरू आहे. सदरचे पाणी शेतकरी व इतरांनी काटकसरीने वापरावे. कालव्यातून नियमबाह्य पद्धतीने सिंचन करू नये, असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.
तालुकानिहाय सिंचनक्षेत्र
नीरा डाव्या कालव्यावर पुणे जिल्ह्यातील ३७ हजार ७० हेक्टर, तर उजव्या कालव्यावर सातारा व सोलापूर जिल्ह्यातील ६५ हजार ५०६ हेक्टर असे एकूण १ लाख २ हजार ५७६ हेक्टर प्रकल्पीय सिंचनक्षेत्र आहे. डाव्या कालव्यावर पुरंदर तालुक्यातील ४२० हेक्टर, बारामतीमधील १३,७८० हेक्टर आणि इंदापूरमधील २२,८७० हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. उजव्या कालव्यावर खंडाळा तालुक्यातील १०६ हेक्टर, फलटण २२,१५८ हेक्टर, माळशिरस ३२,२३६ हेक्टर, पंढरपूर ५,६५६ हेक्टर आणि सांगोला तालुक्यातील २,३५० हेक्टर इतके क्षेत्र अवलंबून आहे.
धरणांतील उपयुक्त पाणीसाठा
भाटघर : १२.८६ : ५६.९९
नीरा देवघर : ५.५२ : ४५.५३
वीर : ५.५६ : ५९.९१ गुंजवणी : २.०२ : ५४.२६