मिशन-अ‍ॅडमिशन; जागा केवळ ५९ हजार अन् दहावी पास झाले ६१ हजार ६३३

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 12:19 PM2020-07-30T12:19:23+5:302020-07-30T12:29:11+5:30

अकरावीच्या प्रवेश जागांपेक्षा सोलापुरातील अडीच हजार विद्यार्थी जास्त

Only 59 thousand seats were passed and 61 thousand 633 were passed | मिशन-अ‍ॅडमिशन; जागा केवळ ५९ हजार अन् दहावी पास झाले ६१ हजार ६३३

मिशन-अ‍ॅडमिशन; जागा केवळ ५९ हजार अन् दहावी पास झाले ६१ हजार ६३३

googlenewsNext
ठळक मुद्देसोलापूरच्या निकालात गतवर्षीच्या तुलनेत १६ टक्क्यांनी वाढ झाली आहेमागील वर्षी जिल्ह्याचा ८१.४३ टक्के निकाल लागला होतायंदा ९६.७३ टक्के मुले तर ९८.५२ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या

सोलापूर : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बुधवारी दुपारी दहावीचा निकाल आॅनलाईन जाहीर केला. जिल्ह्यात एकूण ६१ हजार ६३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेतÞ तर अकरावीसाठी केवळ ५९ हजार ४० जागा आहेत. यामुळे जवळपास अडीच हजार विद्यार्थ्यांच्या पुढील प्रवेशाचा प्रश्न उद्भवणार असल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान, जिल्ह्याबाहेर प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांमुळे हा प्रश्न निकाली निघेल, असे अधिकाºयांनी सांगितले.

मुळातच हा निकाल अनेक दिवसांपासून रखडला होता. सोलापूरच्या निकालात गतवर्षीच्या तुलनेत १६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागील वर्षी जिल्ह्याचा ८१.४३ टक्के निकाल लागला होता तर या वर्षी ९७.५३ टक्के निकाल लागला आहेÞ. याच बरोबर यंदा ९६.७३ टक्के मुले तर ९८.५२ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यातील ४६९ शाळांचा निकाल ही शंभर टक्के लागला आहे.Þ
अकरावीच्या प्रवेशासाठी असलेल्या जागा आणि उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या यामध्ये उत्तीर्ण विद्यार्थी र्यांची संख्या जास्त आहेÞ. पण काही विद्यार्थी शहर सोडून इतर जिल्ह्यात प्रवेश घेतात. काही विद्यार्थी इतरत्र जातात. यामुळे प्रवेशाचा प्रश्न उद्भवणार नाही, असे मत अधिकाºयांकडून  व्यक्त केले.

अकरावी प्रवेशापासून वंचित राहणार नाही
सध्या काही महाविद्यालयांची अकडेवारी जोडली गेली नाही. यामुळे अकरावी प्रवेशासंबंधी विद्यार्थ्यांची अडचण निर्माण होईल असे दिसते. पण असे होणार नाही. एकही विद्यार्थी अकरावीच्या प्रवेशापासून वंचित राहणार नाही. अशी ग्वाही शिक्षण विस्तार अधिकारी अशोक भांजे यांनी दिली.
 

Web Title: Only 59 thousand seats were passed and 61 thousand 633 were passed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.