पंढरपूर तालुक्यात भरल्या अकरापैकी फक्त चार शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:25 AM2021-07-14T04:25:47+5:302021-07-14T04:25:47+5:30
ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे अशा ठिकाणी राज्य सरकारकडून ‘पुनश्च हरिओम’ म्हणत इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे ...
ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे अशा ठिकाणी राज्य सरकारकडून ‘पुनश्च हरिओम’ म्हणत इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील अकरा शाळा सुरू होणार होत्या; मात्र पहिल्याच दिवशी या शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला खो बसल्याचे चित्र दिसून आले.
तालुका विभागाने शाळा सुरू करण्याची तयारी केली; मात्र मात्र काही ठिकाणी कोरोनामुळे विद्यार्थी आले नाहीत. काही ठिकाणी शाळा सुरू करण्याचे आदेश गेले नसल्याचा प्रकार समोर आला. त्यामुळे शिक्षक, पालक, संस्थाचालकांमध्ये एकवाक्यता नसल्याचे दिसले.
तालुक्यात ज्या चार शाळा सुरू झाल्या त्या शाळांमध्ये सर्व वर्गखोल्या, सॅनिटायझर करण्यात आल्या. विद्यार्थ्यांचे तापमान, ऑक्सिजन तपासून विद्यार्थ्यांना प्रवेश दिला. सर्व विद्यार्थी शिक्षक, मास्क बांधून शाळेत आले होते. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
फोटो
करोळे (ता. पंढरपूर) येथील शाळेत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करताना शिक्षक.
----