बार्शीकरांच्या सेवेत असलेले एकमेव आशा टॉकीज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:19 AM2020-12-08T04:19:19+5:302020-12-08T04:19:19+5:30
या थिएटरमध्ये काळानुरूप तंत्रज्ञानातील सर्व नवे बदल केले. सुरुवातीला सिंगल मशीनद्वारे चित्रपट दाखविले जात होते. त्यात बदल करून १९८३ ...
या थिएटरमध्ये काळानुरूप तंत्रज्ञानातील सर्व नवे बदल केले. सुरुवातीला सिंगल मशीनद्वारे चित्रपट दाखविले जात होते. त्यात बदल करून १९८३ साली फोटोफोन डबल मशीनद्वारे चित्रपट दाखविण्यास सुरुवात झाली. त्यानंतर २००४ साली यूएफओ डिजिटल हे तंत्रज्ञान आणले. त्यामुळे मुंबईसोबतच बार्शीमध्ये एकाच वेळी चित्रपट प्रदर्शन होण्याची सोय झाली.
आशा टॉकीजने केवळ चित्रपट दाखविले नाही तर बार्शीच्या धार्मिक सांस्कृतिक जीवनातही नेहमी योगदान दिले. विशेषत: आशा टॉकीजरोडवर गणेशोत्सव अतिशय उत्साहाने साजरा केला जात असे. गणेशोत्सवादरम्यान आशा टॉकीजमध्ये भावगीतांचे कार्यक्रम, विविध सिनेरजनी अशा कार्यक्रमांतून सांस्कृतिक मेजवानी चंदेले बंधू द्यायचे.
कोरोनामुळे छोट्या विक्रेत्यांचे हाल
१४ मार्च २०२० रोजी कोरोनाचे संभाव्य सावट लक्षात घेऊन लॉकडाऊन जाहीर होण्यापूर्वीच जनहितार्थ थिएटर तातडीने बंद केले. लॉकडाऊनमुळे थिएटर परिसरातील खाद्यपदार्थ विक्रेते, चहा कॅन्टीन, पानटपऱ्या, पार्किंग स्टॅन्ड हे व्यवसाय पूर्णपणे बंद झाले आहेत. त्या किरकोळ विक्रेत्यांचे खूप हाल होत आहेत, असे चंदेले यांनी सांगितले. थिएटर व्यवसायावरच्या प्रेमापोटी हे टॉकीज सुरू आहे. भविष्यात प्रेक्षक पुन्हा चित्रपटगृहाकडे वळतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
प्रमुख एकादशीला पौराणिक चित्रपट
बाळाराम चंदेलेे हे अतिशय धार्मिक गृहस्थ होते. त्यांना पौराणिक चित्रपट आवडायचे. बार्शीला द्वादश क्षेत्र म्हणून असलेले महात्म्य त्यांना माहीत होते. आषाढी-कार्तिकीला भगवंत दर्शनाला होणारी गर्दी त्यांना भावायची. प्रेक्षकांचा धार्मिक कल लक्षात घेऊन त्यांनी महत्त्वाच्या एकादशीला कुरुक्षेत्र व संपूर्ण रामायण हे चित्रपट रात्री साडेबारापासून दाखवण्याची सोय केली. त्यांचा हा प्रयोग अतिशय यशस्वी ठरला.
कोट :::::::::::::
आशा टॉकीज शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे .लॉकडाऊनपासून हे बंद स्थितीत आहे. त्यामुळे टॉकीजवर अवलंबून असणारे छोटे व्यवसाय पूर्णतः बंद आहेत. भविष्यात चित्रपटगृहाच्या जागेवर अत्याधुनिक चित्रपटगृह बार्शीकर यासाठी उपलब्ध करण्याचा मानस आहे.
-- जयसिंह चंदेले
मालक, आशा टॉकीज