वीस गावांचा भार असलेल्या टेंभुर्णी आरोग्य केंद्रात केवळ एक डॉक्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:26 AM2021-08-19T04:26:37+5:302021-08-19T04:26:37+5:30
या आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांची ३ पदे मंजूर आहेत. त्यातील एकच डॉक्टर कार्यरत आहे. सध्या २ डॉक्टर, ३ आरोग्यसेवक, ...
या आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांची ३ पदे मंजूर आहेत. त्यातील एकच डॉक्टर कार्यरत आहे. सध्या २ डॉक्टर, ३ आरोग्यसेवक, ५ आरोग्यसेविका व इतर ५ असे एकूण १५ पदे रिक्त आहेत. टेंभुर्णी गावचीच लोकसंख्या २५ हजार आहे. इतर २० गावांतील रुग्णही या आरोग्य केंद्रातच येतात. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण पडत आहे. असलेले कर्मचारी कोरोना टेस्टिंग आणि लसीकरणात गुंतले आहेत. इतर साथीच्या आजारांकडे लक्ष देण्यासाठी डॉक्टरच नाहीत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
.........
इतर तालुक्याच्या तुलनेत सर्दी, पडसे, ताप खोकला आदी साथीच्या आजारांचे रुग्ण कमी आहेत. त्यांच्यासाठी औषधसाठा उपलब्ध आहे. सध्या ५ आरोग्यसेविका व ३ आरोग्यसेवक पदे त्वरित भरणे गरजेचे आहे.
- डाॅ.नंदकुमार घोळवे, वैद्यकीय अधिकारी, टेंभुर्णी.
180821\20210818_105504.jpg
टेस्टींगसाठी आलेले रूग्ण,
आरोग्य केंद्र