शंभर गावात एकच गाव लयभारी कोरोनाला रोखले गावच्या वेशीवरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:23 AM2021-05-21T04:23:17+5:302021-05-21T04:23:17+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शंभर गावात एकच गाव ठरल लयभारी कोरोना महामारीला अडवले गावकऱ्यांनी गावाच्याच बाहेरी . एकशे दोन गावे ...

Only one village out of a hundred stopped the rhythmic corona at the village gate | शंभर गावात एकच गाव लयभारी कोरोनाला रोखले गावच्या वेशीवरी

शंभर गावात एकच गाव लयभारी कोरोनाला रोखले गावच्या वेशीवरी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

शंभर गावात एकच गाव ठरल लयभारी कोरोना महामारीला अडवले गावकऱ्यांनी गावाच्याच बाहेरी . एकशे दोन गावे असणाऱ्या मोहोळ तालुक्यात पाहिल्या लाटेसह दुसऱ्या लाटेत गावात कोरोनाचा एक ही रुग्ण सापडला नाही असे तालुक्यातील एकमेव गाव सापडले ते म्हणजे पासलेवाडी.

मोहोळ तालुक्यातील ६५० लोकसंख्या असणारे हे पासलेवाडी गाव, गावात बहुतांश लोक शेतीच करतात. परंतु शेतीला पूरक म्हणून दुधाचा व्यवसाय ही या गावात चांगलाच चालतो. गतवर्षीच्या कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेत कोरोनाला रोखण्यात जवळपास १० ते १२ गावांनी यश मिळवले होते. परंतु या दुसऱ्या लाटेत ही सर्वच गावे आघाडीवर आली. या सर्व लाटेत मागील वर्षापासून आजअखेर गावात कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही . असे आता तालुक्यातील हे एकमेव गाव राहिले .

या भयानक महामारीला कसे काय रोखले याची माहिती घेतली असता ग्रामविकास अधिकारी भालचंद्र गुंड यांनी सांगितले , या महामारीला रोखण्याचे सर्व श्रेय गावच्या कोरोना आपत्ती व्यवस्थापन समितीला जाते. मागील वर्षी कोरोना महामारीच्या काळात या साथीचे गांभीर्य लक्षात घेऊन गावकऱ्यांनी तातडीने गावात कोरोना आपत्ती व्यवस्थापन समिती स्थापन केली. त्यात सरपंच कविता मोरे ,उपसरपंच अनिल माने, ग्रामविकास अधिकारी भालचंद्र गुंड , तलाठी दादासाहेब सरक , पोलीस पाटील सुखदेव माने, अंगणवाडी सेविका रुपाली गुंड, आशा वर्कर कल्पना गोरे, व गावातील प्रतिष्ठित नागरिक हनुमंत ढोले, संजय खपाले , राहुल पासले,तानाजी पासले यांची कमिटी स्थापन केली. त्या माध्यमातून सर्व गावकऱ्यांनी एकी दाखवून दक्षता घेत आहेत.

दीड वर्षापासून गावात लग्नकार्य सह इतर सर्व कार्यक्रम राबविताना कोरोनाचे सर्व नियम पाळूनच कार्यक्रम केले. या सर्व बाजूंनी घेतलेल्या खबरदारीमुळे तालुक्यात सर्वत्र थैमान घातलेल्या कोरोनावर विजय मिळविण्यात मोहोळ तालुक्यातील पासलेगाव एकमेव गाव ठरले आहे.

----

आपत्ती व्यवस्थापन समितीकडून प्रबोधन

आपत्ती व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून वेळोवेळी शासनाच्या आलेल्या सूचनांचे पालन करणे, गावात वेळोवेळी सोडियम हायपोक्लोराइड फवारण्या, मास्कचा वापर , गावात फिरताना , बसताना सामाजिक अंतर, सॅनिटायझरचा वापर, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या महामारीच्या अनुषंगाने जनजागृती व वेळोवेळी रॅपिडच्या चाचण्या घेण्यात आल्या. यामुळे गावात गत वर्षापासून आजतागायत एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आला नाही.

---

या महामारीला रोखण्यात आपत्ती व्यवस्थापन समितीने घेतलेल्या प्रत्येक निर्णयाला आम्ही राबविलेल्या सर्व उपक्रमाला गावकऱ्यांनी साथ दिली. त्याच बरोबर आम्हाला गटविकास अधिकारी गणेश मोरे , तालुका आरोग्य अधिकारी अरुण पाथरुट यांचेही मोलाचे मार्गदर्शन मिळाले. यामुळेच आम्ही या महामारीला रोखण्यात यशस्वी झालो.- कविता मोरे, सरपंच,पासलेवाडी .

------२०मोहोळ-पासलेवाडी

आपत्ती व्यवस्थापन समिती कोरोनाला हद्दपार करण्याची शपथ घेताना ग्रामस्थ

- गावात वेळोवेळी ज्येष्ठ नागरिकांच्या चाचण्या घेताना आरोग्य पथक

Web Title: Only one village out of a hundred stopped the rhythmic corona at the village gate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.