कनकंबा देवीची यात्रा टाळत केवळ विधी सोहळे पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:27 AM2021-04-30T04:27:12+5:302021-04-30T04:27:12+5:30
करकंब: कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने करकंब (ता. पंढरपूर) येथील ग्रामदैवत कनकंबा मातेची यात्रा रद्द करण्याचा निर्णय यात्रा कमिटीने घेतला ...
करकंब: कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने करकंब (ता. पंढरपूर) येथील ग्रामदैवत कनकंबा मातेची यात्रा रद्द करण्याचा निर्णय यात्रा कमिटीने घेतला आहे. मात्र साध्या पद्धतीने विधी सोहळे पूर्ण करत यात्रेची सुुरुवात आणि समारोप केला.
ग्रामदैवत कनकंबा देवी यात्रा महोत्सव गुरुवारी पहाटे पाच वाजता महापूजेने सुरु झाला. उज्ज्वलसिंह देशमुख व अशोक देशमुख यांच्या हस्ते महापूजा झाली. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सर्व मनोरंजनाचे कार्यक्रम छबिना आदी कार्यक्रम रद्द करण्यात आले.
करकंब पोलीस स्टेशनचे पाटील, ट्रस्टी अध्यक्ष अमरसिंह देशमुख, उज्ज्वलसिंह देशमुख, पंच कमिटीचे अमोल शेळके, बाजीराव खाडे, दत्तात्रय खारे, अजितसिंह देशमुख, विलास धनवे, पांडुरंग शेटे, नात्याबा मोहिते, राजाभाऊ शेटे, अशोक देशमुख, विजयसिंह निकम, शिवाजी सरगर, हरी काटवटे उपस्थित होते. अत्यंत साध्या पद्धतीने संध्याकाळी पालखीची मंदिरास प्रदक्षिणा घालून यात्रेची सांगता करण्यात आली.