तरच शेतक-यांना आधारभूत किंमत देणे शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:22 AM2021-04-01T04:22:56+5:302021-04-01T04:22:56+5:30
विठ्ठलराव शिंदे कारखान्याची सर्वसाधारण संस्थापक अध्यक्ष आ. बबनराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कारखाना कार्यस्थळावर ऑनलाईन पद्धतीने पार पडली. यावेळी उपाध्यक्ष ...
विठ्ठलराव शिंदे कारखान्याची सर्वसाधारण संस्थापक अध्यक्ष आ. बबनराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कारखाना कार्यस्थळावर ऑनलाईन पद्धतीने पार पडली. यावेळी उपाध्यक्ष वामनभाऊ ऊबाळे व सर्व संचालक उपस्थित होते. विषय पत्रिकेचे वाचन प्र. कार्यकारी संचालक सुहास यादव यांनी केले. अनुक्रमे १ ते १८ ठराव एकमताने मंजुर करण्यात आले.
आ. शिंदे म्हणाले, मागील हंगामात केंद्र शासनाने साखरेचे उत्पादन जास्त झाल्यामुळे निर्यात साखरेस अनुदान देण्याचे धोरण निश्चित केले. यामुळे याचा फायदा कारखान्याना एफआरपी देण्यासाठी झाला. तरीही अनुदानाचे ७४ कोटी रुपये कारखान्यास येणे बाकी आहे.
कारखान्याने चालू गळीत हंगामात शेतकऱ्यांना प्रतिटन २००० रुपये ॲडव्हान्स दिलेला आहे. तसेच उसाचे सर्व पेमेंट बँकेत जमा केलेले आहे. केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या साखर निर्यात कोट्याप्रमाणे साखर विक्री झालेली आहे. आणखी ६ लाख पोती साखर निर्यात करण्याचा प्रयत्न आहे.
पुढील हंगामात नवीन धोरणाप्रमाणे सुरुवातीपासून इथेनॉल निर्मितीस प्राधान्य राहील. दररोज तीन लाख लिटर इथेनॉल तयार करणार आहोत. ६ कोटी ७५ लाख युनिट वीज निर्यात केली आहे. चालू हंगामात दोन्ही युनिटचे मिळून १९ लाख मे. टन गाळप झाले आहे. डिस्टलरी प्रकल्प वाढवून इथेनॉल कसे वाढेल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
एफआरपी वाढली, पण साखरेचे दर कायम
एफआरपी वाढत राहिली पण साखरेचे दर कायम आहेत. जिल्ह्यातील ९० टक्के साखर कारखानदारी अडचणीत आहे. आभार संचालक सुरेश बागल यांनी मानले.
या सभेस संचालक वेताळ जाधव, रमेश येवले-पाटील, विष्णू हुंबे, लक्ष्मण खूपसे, पोपट चव्हाण, शिवाजी डोके, पांडुरंग घाडगे, पोपट गायकवाड, सुरेश बागल, सचिन देशमुख, सिंधुताई नागटिळक, लाला मोरे, सुभाष नागटिळक उपस्थित होते.
तसेच वर्क्स मॅनेजर सी. एस. भोगडे, मुख्य रसायनी पी. एस. येलपले, फायनान्स मॅनेजर डी. व्ही. लव्हटे, डिस्टलरी मॅनेजर पी. व्ही. बागल, मुख्य शेतकी अधिकारी एस. पी. थिटे, सिव्हील इंजिनिअर एस. आर. शिंदे, मार्केटिंग मॅनेजर एन. एम. नायकुडे, हेड टाईम कीपर आर. एन. आतार,सुरक्षा अधिकारी एफ. एम. दुंगे हे अधिकारी, परचेस आफिसर जे. डी. देवडकर, अनिल वीर यांनी ऑनलाईन सहभाग घेतला.