डोंबरजवळगे यात्रेनिमित्त केवळ पारंपरिक कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:16 AM2021-06-17T04:16:00+5:302021-06-17T04:16:00+5:30
डोंबरजवळगे येथील महालक्ष्मी यात्रेला शेकडो वर्षांचा इतिहास आहे. रंगात बसणारी महालक्ष्मी पाहण्यासाठी दर यात्रेत हजारो भाविक येत. सोमवारी रात्री ...
डोंबरजवळगे येथील महालक्ष्मी यात्रेला शेकडो वर्षांचा इतिहास आहे. रंगात बसणारी महालक्ष्मी पाहण्यासाठी दर यात्रेत हजारो भाविक येत. सोमवारी रात्री देवी रंगात बसली. यावेळी केवळ मानकरी, सेवेकरी व ट्रस्टी उपस्थित होते. यावेळी सरपंच चिदानंद माळगे, शिवलिंगप्पा पाटील, अप्पाशा चिवरे, हिरामणी नारायणकर, पोलीस पाटील पूनम गायकवाड, अंबणप्पा दुलंगे, रामू माळगे, अप्पाशा पाटील, गजू पुजारी, रेवणय्या स्वामी, शंकर माळी, नरसप्पा उदगिरे आदी उपस्थित होते.
----
घराघरांत साडी-चोळीचा मान
डोंबरजवळगे येथील महालक्ष्मी यात्रा दर दोन वर्षांनी होते. यामध्ये देवीची मूर्ती मानकऱ्यांकरवी प्रत्येक घरात पोहोचते. यामध्ये कोणत्याही प्रकारचा जातिभेद नसतो. प्रत्येक घरात साडी-चोळीचा मान घेते. विशेषतः डोंबरजवळगेतील मुस्लिमांच्या घरात जाऊन साडी-चोळीचा मान घेणारी महालक्ष्मी यंदाच्या वर्षी घरी येणार नसल्याने भाविकांमध्ये नाराजी पसरली आहे.
-----
===Photopath===
150621\4513img-20210615-wa0018.jpg
===Caption===
डोंबरजवळगे येथील देवी रंगात बसल्यानंतर पुजा करताना सरपंच चिदानंद माळगे,विश्वस्त हिरामणी नारायणकर,पोलिस पाटील पूनम गायकवाड व गजु पूजारी