देशी, विदेशी दारू, बीयरची चढ्या भावाने खुलेआम विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:23 AM2021-04-27T04:23:04+5:302021-04-27T04:23:04+5:30
ग्रामीण भागात कोरोना पाय पसरत असताना दारू विक्रीला जोर आल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त करण्यात येत असले तरी उत्पादन शुल्क ...
ग्रामीण भागात कोरोना पाय पसरत असताना दारू विक्रीला जोर आल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त करण्यात येत असले तरी उत्पादन शुल्क विभागाने मात्र ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’ हीच भूमिका घेतली आहे.
कोरोनावर मात करण्यासाठी आरोग्य कर्मचारी रुग्णालयात तर पोलीस रस्त्यावर कर्तव्य बजावत आहेत. याचाच फायदा ग्रामीण भागातील गल्लीबोळात अवैध दारू विक्रेते घेत आहेत.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र संचारबंदी लागू आहे. अशा स्थितीत केवळ जीवनावश्यक वस्तू सेवा वगळता इतर सर्व व्यवहार ठप्प आहेत. संचारबंदीचा लाभ घेत चढ्या दराने देशी, विदेशी दारू, बीयर व गावठी दारू विक्री सुरू असल्याचे नागरिक सांगतात. लॉकडाऊनचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन होत असताना याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.