ऑपरेशन नन्हे फरिश्ते : घर सोडून गेलेली ३९ मुले पालकांच्या ताब्यात

By रूपेश हेळवे | Published: October 11, 2023 07:07 PM2023-10-11T19:07:09+5:302023-10-11T19:07:29+5:30

७३३ मुलांमध्ये ५१७ मुले आणि २१६ मुलींचा समावेश आहे. चाइल्डलाइन सारख्या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने त्यांचे पालकांशी पुनर्मिलन झाले आहे

Operation Nanhe Farishte: 39 children who ran away from home are in the custody of their parents | ऑपरेशन नन्हे फरिश्ते : घर सोडून गेलेली ३९ मुले पालकांच्या ताब्यात

ऑपरेशन नन्हे फरिश्ते : घर सोडून गेलेली ३९ मुले पालकांच्या ताब्यात

सोलापूर : मध्य रेल्वेच्या रेल्वे संरक्षण दलाने “ऑपरेशन नन्हे फरिश्ते” अंतर्गत गेल्या ६ महिन्यांत म्हणजे एप्रिल ते सप्टेंबर मध्ये रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवरून शासकीय रेल्वे पोलीस आणि इतर फ्रंटलाइन रेल्वे कर्मचारी यांच्या समन्वयाने ७३३ मुलांना नातेवाईंच्या ताब्यात दिले. यात सोलापूर विभागात ३९ मुलांना त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. यातील बहुतांश मुले हे मोठ्या शहरातील ग्लॅमरला भुलून, किंवा आई वडिलांशी भांडण झाल्याने घर सोडून गेलेले होते.

भांडणामुळे, काही मुले कौटुंबिक समस्यांमुळे, किंवा चांगले जीवन, मोठ्या शहराचे ग्लॅमरला भुलून इत्यादींच्या शोधात आपल्या कुटुंबियांना न सांगता रेल्वेने जाणार्या ७३३ मुलांचा शोध घेत रेल्वे पोलिसांनी त्यांना नातेवाईकांच्या ताब्यात दिले. यासाठी रेल्वे स्थानकावर येणारी मुले प्रशिक्षित आरपीएफ जवानांना आढळतात. हे प्रशिक्षित आरपीएफ कर्मचारी मुलांशी बोलून त्यांच्या समस्या समजून घेतात आणि त्यांना त्यांच्या पालकांकडे जाण्याचा सल्ला देतात. ७३३ मुलांमध्ये ५१७ मुले आणि २१६ मुलींचा समावेश आहे. चाइल्डलाइन सारख्या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने त्यांचे पालकांशी पुनर्मिलन झाले आहे

Web Title: Operation Nanhe Farishte: 39 children who ran away from home are in the custody of their parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.