वाहतुकीचे नियम मोडणाºया १८ स्कूल बसवर सोलापूरात कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 11:05 AM2018-10-06T11:05:28+5:302018-10-06T11:06:41+5:30

Operation of Solapur on 18 school buses | वाहतुकीचे नियम मोडणाºया १८ स्कूल बसवर सोलापूरात कारवाई

वाहतुकीचे नियम मोडणाºया १८ स्कूल बसवर सोलापूरात कारवाई

googlenewsNext
ठळक मुद्देस्कूल बससह रिक्षावर कारवाई करण्याची मोहीम हाती घेण्यात आलीया मोहिमेसाठी आरटीओने सहा पथके नेमली प्रत्येक पथकात तीन मोटार वाहन निरीक्षकांचा समावेश

सोलापूर : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया १८ स्कूल बसवर आज शहर वाहतूक शाखा आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाने संयुक्तपणे कारवाई केली. वैध परवाना नसणे, स्कूल बसच्या योग्यता प्रमाणपत्राची संपलेली मुदत, विद्यार्थी वाहतूक धोरणाची पूर्तता न करणे, वाहनांमधून क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक करणे आदी प्रकार तपासणीत आढळून आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकर पाटील यांनी दिली. 

 शुक्रवारी १० वाहनांवर शहर वाहतूक शाखेने कारवाई केली असून, त्यापैकी २ बसवर दंडात्मक कारवाई करून त्या सोडून दिल्या़ ही कारवाई उत्तर व दक्षिण वाहतूक शाखेच्या पथकाने शांती चौक, नवीवेस व आदी शाळा परिसरात केल्या आहेत़  तत्पूर्वी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पथकाने गुरुवारी ८ स्कूल बसवर कारवाई केल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांनी दिली.

शहर वाहतूक शाखा व प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून शालेय विद्यार्थी वाहतूक करणाºया वाहनांची तपासणी करून वाहतुकीचे नियम मोडणाºया स्कूल बससह रिक्षावर कारवाई करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे़ या मोहिमेसाठी आरटीओने सहा पथके नेमली असून, प्रत्येक पथकात तीन मोटार वाहन निरीक्षकांचा समावेश आहे.

शुक्रवारी शहर वाहतूक शाखेच्या उत्तर व दक्षिण विभागाच्या पोलीस अधिकाºयांनी शहर आणि उपनगरातील शांती चौक, नवीवेससह इतर ठिकाणच्या १० स्कूल बसवर कारवाई केली़ या कारवाई केलेल्या गाड्या जेलरोड पोलीस ठाण्याशेजारी असलेल्या वाहतूक शाखेच्या कार्यालयापुढे लावण्यात आलेल्या आहेत़ कारवाईतील प्रत्येक गाड्यांना नोटीस (मेमो) देण्यात आल्याचेही वाहतूक शाखेचे कमलाकर पाटील यांनी सांगितले़ या मोहिमेत पोलीस निरीक्षक आनंद माळाले, सहायक पोलीस निरीक्षक संजीव भोसले, पो. कॉ. नागरगोजे, केसकर, बिराजदार, वागज आणि जाधव यांचा समावेश होता.
कारवाई अटळ
- शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाºया वाहनांवर येत्या काळात कारवाई सुरूच राहणार आहे. वाहतूक शाखा व परिवहन विभाग अशा दोन विभागांकडून संयुक्तपणे कारवाई करण्यात येत आहे़ वाहनधारकांनी वाहन क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक केल्यास कारवाई अटळ आहे़ वाहतुकीच्या नियमांचे पालन करून कारवाई टाळावी, असे आवाहन वरिष्ठ पोलीस वाहतूक निरीक्षक कमलाकर पाटील यांनी केले आहे.

Web Title: Operation of Solapur on 18 school buses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.