फक्त पाचशे रुपयाची लाच घेताना महिला व बालविकास विभागातील ऑपरेटर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
By Appasaheb.patil | Published: February 22, 2023 11:09 PM2023-02-22T23:09:21+5:302023-02-22T23:10:06+5:30
एका ऑपरेटरला पाचशे रुपयाची लाच घेताना सोलापूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले आहे.
आप्पासाहेब पाटील, सोलापूर: महिला व बालकल्याण विभाग, संरक्षण अधिकारी अभय केंद्र कार्यालय, उत्तर सोलापूर येथील कार्यरत असलेल्या एका ऑपरेटरला पाचशे रुपयाची लाच घेताना सोलापूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले आहे.
किशोर सखाराम मोरे (वय 53) असे अटक करण्यात आलेल्या ऑपरेटरचे नाव आहे. यातील तक्रारदार यांचे विरुद्ध त्यांच्या पत्नीने न्यायालयात दाखल केलेल्या तक्रारीमध्ये समनसची तारीख वाढवून देण्यासाठी व कोर्टात चांगला रिपोर्ट पाठवतो असे सांगून लोकसेवक किशोर मोरे यांनी पंधराशे रुपये लाचेची मागणी करून एक हजार रुपये स्वीकारले होते, उर्वरित पाचशे रुपये लाच पंचांसमक्ष स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. हा सापळा पोलीस अधीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रकांत कोळी, पोलीस अंमलदार पकाले, घुगे, किंणगी, सन्नके यांच्या पथकाने केली. या प्रकरणी सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"