विरोधकांकडून नामुष्कीचा आरोप बिनबुडाचा: नगराध्यक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:22 AM2021-05-13T04:22:33+5:302021-05-13T04:22:33+5:30

ठेकेदाराने उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन झाल्यानंतर पुढील योग्य ती कार्यवाही करू. शंका निरसन न झाल्यास या कामाबाबत पुन्हा फेर ...

Opponents accuse Binbuda of humiliation: Mayor | विरोधकांकडून नामुष्कीचा आरोप बिनबुडाचा: नगराध्यक्ष

विरोधकांकडून नामुष्कीचा आरोप बिनबुडाचा: नगराध्यक्ष

Next

ठेकेदाराने उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन झाल्यानंतर पुढील योग्य ती कार्यवाही करू. शंका निरसन न झाल्यास या कामाबाबत पुन्हा फेर ई निविदा प्रसिद्ध केली जाईल. सभागृहात आमचे दोन तृतीयांश बहुमत आहे. त्यामुळे आम्हाला हा विषय बहुमताने मंजूर करता आला असता. विरोधी पक्षनेत्यांनी आमच्यावर नामुष्कीचा केलेला आरोप बिनबुडाचा आहे, असे नगराध्यक्ष म्हणाले.

आम्ही या विषयावर सभागृहात साधक बाधक चर्चा केली. विरोधी सदस्यांच्या मताचा विचार करून विषय क्रमांक १९ सर्वानुमते तहकूब करत पुढील सभेत पुन्हा हा विषय मंजुरीसाठी ठेवला जाईल, असे सांगितल्याचे तांबोळी यांनी स्पष्ट केले.

---अशी आहे ही योजना

बार्शी नगर परिषदेच्या वतीने शहरात नगर परिषदेच्या मालकीच्या गट नंबर ११९६ मध्ये राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या परवडणारी घरे योजने (एएचपी) अंतर्गत एकूण १५९६ लाभार्थ्यांना सदर घरकुलाचा लाभ होणार आहे.

-----

Web Title: Opponents accuse Binbuda of humiliation: Mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.