विरोधकांना जनतेने पुरते ओळखले तरीही थापा मारतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:28 AM2021-09-16T04:28:10+5:302021-09-16T04:28:10+5:30
शहरातील कश्यपी प्लॉट व परिसरातील भागात सुमारे ७० लाख रुपये किमतीचे रस्ते, गटारी, दिवाबत्तीची विविध विकासकामे केल्याबद्दल ...
शहरातील कश्यपी प्लॉट व परिसरातील भागात सुमारे ७० लाख रुपये किमतीचे रस्ते, गटारी, दिवाबत्तीची विविध विकासकामे केल्याबद्दल आ. राजेंद्र राऊत यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष ॲड. आसिफ तांबोळी, दादासाहेब गायकवाड, प्रमोद मालपाणी, सुहास पाटील, मनीष रूगले, नितीन गुडमेवार, नंदकिशोर पल्लोड, जीवन लोखंडे, अमर गरड, लोहिया , काळे सर, मंगेश मुलगे उपस्थित होते.
आ. राजेंद्र राऊत म्हणाले, नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून आमदार आपल्या दारी हा उपक्रम राबवित आहेत. कश्यपी प्लॉट भागातीलही रस्ते, गटारी, दिवाबत्तीची कामे पूर्ण झाली आहेत. अपूर्ण राहिलेल्या वादग्रस्त मुख्य रस्त्याचा विषय मा. न्यायालयात प्रलंबित आहे. तोही विषय सामंजस्याने मिटवून रस्ता लवकर पूर्ण करणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांच्या काळात बार्शीच्या गुंठेवारीत अनेक चुकीच्या बाबी घडल्या. परंतु शासनाने कालांतराने त्या नियमित केल्या. मात्र, आमची सत्ता पालिकेत आल्यानंतर गुंठेवारीच्या कायद्यात कडकपणा आणला. आम्ही घालून दिलेल्या नियमानुसार गुंठेवारी लेआऊट करताना पूर्ण रस्ते, गटार, लाईट, झाडे, बोर, पाईपलाईन, ओपन स्पेसला कंपाऊंड करून तो पालिकेच्या नावावर केल्याशिवाय अंतिम मंजुरी नाही. त्यामुळे ओपन स्पेसच्या बाबतीत चुकीच्या घटना घडण्याचे कारण नाही, असे मत आ. राऊत यांनी यावेळी मांडले. मयुर गलांडे यांनी सूत्रसंचालन केले.
.............
सोबत फोटो
140921\57231625-img-20210914-wa0046.jpg
नगरपालिका कार्यक्रम