तीन प्रभागांत विरोधकांचे डिपॉझिट जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:20 AM2021-01-21T04:20:57+5:302021-01-21T04:20:57+5:30

भोसे ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून या ग्रामपंचायतीवर स्व. राजूबापू पाटील यांची एकहाती सत्ता होती. नुकतेच त्यांचे कोरोना आजाराने निधन झाले. त्यांच्या ...

Opponents' deposits confiscated in three wards | तीन प्रभागांत विरोधकांचे डिपॉझिट जप्त

तीन प्रभागांत विरोधकांचे डिपॉझिट जप्त

Next

भोसे ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून या ग्रामपंचायतीवर स्व. राजूबापू पाटील यांची एकहाती सत्ता होती. नुकतेच त्यांचे कोरोना आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव विद्यमान उपसरपंच ॲड. गणेश पाटील, चुलते रावसाहेब पाटील, भाऊ शेखर पाटील, धैर्यशील पाटील यांच्या सहकार्याने या निवडणुकीत एकहाती सत्ता राखून ठेवली आहे.

यामध्ये वॉर्ड १ : भारत किसन जमदाडे (विजयी) विरुद्ध कांचन कोरके, वाॅर्ड क्र. ३ : रुक्मिणी कृष्णात माळी (विजयी) विरुद्ध सारिका माळी, तानाजी शिवाजी नाईकनवरे (विजयी) विरुद्ध कांचन कोरके, वाॅर्ड क्र. ४ : देविदास एकनाथ जमदाडे (विजयी) विरुद्ध कांचन कोरके व जीवन तळेकर, वाॅर्ड क्र. ५ : गणेश पांडुरंग पाटील (विजयी) विरुद्ध बाळू कोरके, वाॅर्ड क्र. ६ : नामदेव मारुती कोरके विजयी विरुद्ध बाळू कोरके अशी लढत झाली.

फोटो ओळी ::::::::::::::::::::

भोसे (ता. पंढरपूर) येथील ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांनी स्व. राजूबापू पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करून विजयोत्सव साजरा केला. यावेळी रावसाहेब पाटील, शेखर पाटील आदींसह विजयी उमेदवार.

Web Title: Opponents' deposits confiscated in three wards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.