चार गावांत सळसळत्या १५ तरुणाईला संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:23 AM2021-01-23T04:23:11+5:302021-01-23T04:23:11+5:30
अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर, गौडगाव बु., संगोगी (आ.), नागूर या चारही ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांनी सत्ताधाऱ्यांच्या मतपेटीत भरघोस मते ...
अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर, गौडगाव बु., संगोगी (आ.), नागूर या चारही ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांनी सत्ताधाऱ्यांच्या मतपेटीत भरघोस मते देत पुन्हा संधी दिली आहे. शिवाय, या चारही गावांत ३८ जागांंपैकी १५ ठिकाणी तरुण-तरुणींनी यश मिळविले आहे.
कुरनूर गाव तसे राजकीयदृष्ट्या संवेदनशील गाव. यंदा पं.स. माजी विरोधी पक्षनेते बाळासाहेब मोरे, व्यंकट मोरे, माजी सरपंच अमर पाटील, युवक राहुल काळे असे तब्बल चार पॅनल निवडणूक रिंगणात होते. यापैकी पाटील यांचा एकही उमेदवार निवडून आला नाही, तर नवीन काळे गटाला खातेही उघडता आले नाही. बाळू मोरे यांच्या पॅनलला तीन जागांंवर समाधान मानावे लागले. व्यंकट मोरे यांना बहुमत मिळाले. निवडून आलेले सदस्य : विद्यमान सरपंच वत्सलाबाई मोरे, लक्ष्मी शिंगोटे, रुक्साना मुजावर, नवशाद तांबोळी, राजू गवळी, व्यकंट मोरे, अलका सुरवसे, सुनंदा शिंदे अशा आठ जागा पीर सातू सय्यद बाबा शेतकरी, शेतमजूर ग्रामविकास पॅनलला मिळाल्या. तर, कै. ब्रह्मानंद मोरे पॅनलला रमेश पोतदार, चेतन मोरे, रेश्मा शिंदे अशा तीन जागा मिळाल्या.
तालुक्यात यंदा नम्रता, सौजन्यशील व्यक्तींना बऱ्याच गावात यश मिळाले आहे. त्यापैकीच गौडगाव येथील वीरभद्र सलगरे, रेवणसिद्ध कुंभार गटाला भरघोस मते मिळाली आहेत. सुगलाबाई बनसोडे, कस्तुरबाई माने, खाजप्पा बनसोडे, वैष्णवी सलगरे, यलप्पा हडपद, कस्तुरबाई सलगरे, राजश्री कुंभार, रामदास वाघमोडे अशा आठ तर सिद्धाराम म्हेत्रे, शंकर पाटील गटाच्या सुनीता पाटील, भौरम्मा म्हेत्रे, जकप्पा पुजारी असे तीन सदस्य निवडून आले. नागूर येथेही पारंपरिक विरोधक संगमनाथ आलमद गटाला धक्का देत विजयकुमार नागुरे व गंगाराम चव्हाण यांच्या गटांनी सहा जागा जिंकल्या. शांताबाई चव्हाण, पंकज नागुरे, नागम्मा धनगर, सखींनाबी इब्राहिमपुरे, वीरभद्र भोगनळळी, गुंडप्पा कुंभार अशा सहा नागुरे गट तर महानंदा आलमद, रेवणप्पा पुजारी, सिधम्मा कबाडगे असे तीन उमेदवार निवडून आले.
संगोगी (आ.) येथे खेड, ठोंबरे, पाटील गटाविरुद्ध पारंपरिक विरोधक गुत्तेदार गट नेहमी चुरशीची निवडणूक लढतात, मात्र यश मिळत नाही. यंदा गुत्तेदार गटाचा दारुण पराभव करीत सर्व जागा श्री बसवमहालिंग गटाने मिळवल्या. श्रीदेवी चव्हाण, माळसाबाई उडगी, बसवराज निम्मे, बसणा उडगी, पुतळाबाई खेड, लक्ष्मीपुत्र चिन्मगेरी, सावित्रा चलगेरी असे सात उमेदवार निवडून आले.
या गावात मिळवलं तरुणाईनं यश
गौडगाव येथे वैष्णवी, सुनीता, जकप्पा अशा तिघा तरुणाईने यश मिळवले. वहिनी सुनीता यांनी दीर कलमेश्वर पाटील यांच्यावर मात केली. कुरनूृरमध्ये लक्ष्मी, राजू, व्यंकट, चेतन, रेश्मा अशी पाच तरुणाईला संधी मिळाली. तसेच लक्ष्मी शिंगटे या सुनेने सासू उज्ज्वला शिंगटे यांचा पराभव केला. नागूरमध्ये पंकज, नागम्मा, वीरभद्र, महानंदा अशा चार तरुणांना मतदारांनी संधी दिली. संगोगीत श्रीदेवी, लक्ष्मीपुत्र, सावित्रा अशा तिघांना प्रथमच संधी मिळाळी. अशा तब्बल १५ तरुण-तरुणींना गावकऱ्यांनी संधी दिली. तसेच मांतप्पा चिन्मगेरी या पुतण्याचा लक्ष्मीपुत्र काकांनी पराभव केला. सासू कुसूम चलगेरी यांची सून सावित्रा यांनी दारुण पराभव केला.
फोटो : गौडगाव बु. येथील सरपंच सलगरे गट विजयोत्सव साजरा करताना.