सीताफळ शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना अन्नप्रक्रिया उद्योगात संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:20 AM2020-12-24T04:20:21+5:302020-12-24T04:20:21+5:30

राष्ट्रीय किसान दिनानिमित्त अखिल भारतीय सीताफळ महासंघातर्फे आयोजित शेतकरी मेळावा व चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी महिला शेतकरी ...

Opportunity in the food processing industry for custard apple farmers | सीताफळ शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना अन्नप्रक्रिया उद्योगात संधी

सीताफळ शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना अन्नप्रक्रिया उद्योगात संधी

Next

राष्ट्रीय किसान दिनानिमित्त अखिल भारतीय सीताफळ महासंघातर्फे आयोजित शेतकरी मेळावा व चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी महिला शेतकरी सपना मगर, विश्वनाथ देवरमी उपस्थित होते.

यावेळी डॉ. कसपटे यांनी लागवड कशी करायची, रोपांमधील अंतर किती ठेवायचे, संगोपन कसे करायचे, छाटणी कशी करायची, पाण्याचे व्यवस्थापन, मृगबहर, खत व्यवस्थापन, फळ तोडणी, ग्रेडिंग, पॅकेजिंग याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी सपना मगर, विश्वनाथ देवरमी यांनी मार्गदर्शन केले. रवींद्र कसपटे यांनी कीड रोग व्यवस्थापन, या विषयावर माहिती दिली. मेळाव्यानंतर शेतकऱ्यांना शिवारफेरी घडवून सीताफळांच्या विकासासाठी विविध टप्प्यांची माहिती देण्यात आली. या मेळाव्याला राज्यातील विविध जिल्ह्यातून शेतकरी आले होते. सूत्रसंचालन नवनाथ जगताप यांनी केले तर आभार प्रवीण कसपटे यांनी मानले.

Web Title: Opportunity in the food processing industry for custard apple farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.