१४१ ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेत सेवेची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:17 AM2021-05-31T04:17:26+5:302021-05-31T04:17:26+5:30
माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील २००५ साली राज्याचे ग्रामविकास मंत्री असताना ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे तत्कालीन अध्यक्ष धैर्यशील मोहिते-पाटील यांनी १० ...
माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील २००५ साली राज्याचे ग्रामविकास मंत्री असताना ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे तत्कालीन अध्यक्ष धैर्यशील मोहिते-पाटील यांनी १० वर्ष काम पूर्ण झालेल्या व ४५ वर्षे वयाच्या आतील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेत सेवा करण्याची संधी मिळावी, अशी विजयसिंह मोहिते-पाटील यांच्याकडे मागणी केली. त्यांनी या मागणीची तत्काळ दखल घेत अध्यादेश जारी केला होता. त्याचा लाभ राज्यातील सुमारे पाच हजार कर्मचाऱ्यांना झाला आहे.
माळशिरस तालुक्यातून स्थापत्य अभियंता ३, आरोग्यसेवक ४, सांखिकी. वि. अ. १, अंगणवाडी पर्यवेक्षक १, परिचर ११ अशा २० ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळाली. यामध्ये सचिन पिसे (पिसेवाडी), मौला मुलाणी (उंबरे-दहिगाव), संतोषकुमार गायकवाड (बागेचीवाडी), आण्णा चव्हाण (गिरवी), सचिन मोरे (दहिगाव), सविता काळे, सुनील जाधव, उस्मान पठाण (अकलूज), बाबू गायकवाड (उंबरे-वेळापूर), विजय माळी (खुडूस), उमेश वाघमारे (कोळेगाव), दत्तात्रय धायगुडे (डोंबाळवाडी (कु), गुलाब गाडे (वाफेगाव), चंद्रकांत बंडगर (डोंबाळवाडी (खु), सचिन केंगार (मोरोची), रसूल मुलाणी (तरंगफळ), सलीम तांबोळी (संग्रामनगर), सुखदेव कदम (नेवरे), श्रीमंत मिसाळ (जाधववाडी), प्रकाश सुळे (सुळेवाडी) हे पदोन्नती मिळालेले कर्मचाऱी आहेेत.