साेालपूर विद्यापीठाच्या प्रवेशपूर्व परीक्षेसाठी शुक्रवारपर्यंत अर्ज करण्याची संधी

By बाळकृष्ण दोड्डी | Published: July 17, 2023 07:22 PM2023-07-17T19:22:49+5:302023-07-17T19:23:10+5:30

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संकुलात तसेच संलग्न काही महाविद्यालयांमध्ये विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता ...

Opportunity to apply till Friday for Saalpur University Pre-Entrance Test | साेालपूर विद्यापीठाच्या प्रवेशपूर्व परीक्षेसाठी शुक्रवारपर्यंत अर्ज करण्याची संधी

साेालपूर विद्यापीठाच्या प्रवेशपूर्व परीक्षेसाठी शुक्रवारपर्यंत अर्ज करण्याची संधी

googlenewsNext

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूरविद्यापीठाच्या संकुलात तसेच संलग्न काही महाविद्यालयांमध्ये विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता प्रवेश घेण्यासाठी प्रवेशपूर्व परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी आता शुक्रवार, २१ जुलैपर्यंत विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करता येणार असल्याची माहिती कुलसचिव योगिनी घारे व परीक्षा विभागाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपूर यांनी दिली.

विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत आणि प्र-कुलगुरू डॉ. गौतम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रवेशपूर्व परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे. सुरुवातीला अर्ज करण्याची मुदत १७ जुलैपर्यंत होती. यास आता मुदतवाढ मिळाली आहे. पदवी उत्तीर्ण विद्यार्थी व पदवी अंतिम परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश पूर्व परीक्षेसाठी बसता येणार आहे.

Web Title: Opportunity to apply till Friday for Saalpur University Pre-Entrance Test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.