मिनी लॉकडाऊनला विरोध, दुकानी उघण्यास परवानगी द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:23 AM2021-04-09T04:23:05+5:302021-04-09T04:23:05+5:30
कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी शासनाने ५ एप्रिलपासून कडक निर्बंध लादले. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व मॉल्स, रेस्टॉरंट, बार, सलून, ब्युटी पार्लर ...
कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी शासनाने ५ एप्रिलपासून कडक निर्बंध लादले. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व मॉल्स, रेस्टॉरंट, बार, सलून, ब्युटी पार्लर बंद करण्याचा निर्णय घेतला. एकीकडे कोरोनाला अटकाव करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत असताना तालुक्यातील व्यापारी संघटना व विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून या नवीन आदेशाला विरोध होत आहे. व्यापारी शिष्टमंडळाच्या अडचणी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना फोन करुन माहिती दिली.
एकीकडे तालुक्याचे तहसीलदार अंजली मरोड यांनी कोरोनाला अटकाव करण्यासाठी शासनाने लादलेल्या नव्या निर्बंधाविषयी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला आवाहन करताना दिसतात. दुसरीकडे व्यापारी संघटना आणि विविध पक्षाचे पदाधिकारी या निर्बंधाला विरोध करताना दिसतात. यामध्ये पोलीस प्रशासनाला मात्र काय निर्णय घ्यावे हे समजेेनासे झाले आहे. तसेच रिपाइंकडून सुद्धा ठराविक वेळेसाठी दुकाने सुरू ठेवण्याची मागणी केली आहे. याबाबत निवेदन तालुकाध्यक्ष अविनाश मडिखांबे यांनी दिले.
कोट :::::::::
गेल्या वर्षभरापासून व्यापारी वर्ग आर्थिक संकटात आहेत. त्यात पुन्हा मिनी लॉकडाऊन लावून व्यापाऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम सुरु आहे. आम्ही नियम पाळू, पण दुकाने चालू करण्यास परवानगी द्यावी.
- मल्लिनाथ साखरे,
अध्यक्ष, व्यापारी महासंघ
फोटो
०८अक्कलकोट-निवेदन
ओळ
दुकाने चालू करण्यासाठी तहसीलदार अंजली मरोड यांना निवेदन सादर करताना व्यापारी महासंघाचे पदाधिकारी.