राममंदिराच्या उभारणीसाठी सर्वसामान्यांच्या सहभागालाही विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:19 AM2020-12-24T04:19:50+5:302020-12-24T04:19:50+5:30
जुहू (मुंबई) येथे वारकरी साहित्य परिषदेतर्फे घेतलेल्या नवव्या संत साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय ...
जुहू (मुंबई) येथे वारकरी साहित्य परिषदेतर्फे घेतलेल्या नवव्या संत साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, स्वागताध्यक्ष पंढरपूरचे जिल्हा सत्र न्यायाधीश ह.भ.प. चकोर महाराज बाविस्कर, ह. भ. प. माधव महाराज शिवणीकर, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, संत साहित्याचे अभ्यासक सदानंद मोरे, कीर्तीपाल सर्वगोड, तेजस कांबळे उपस्थित होते.
रामदास आठवले यांनी संत परंपरेचा वारसा चालवण्यासाठी आवश्यक ती मदत करू, असे आश्वासन दिले. आभार प्रदर्शन ह.भ.प. रामकृष्ण लहवितकर यांनी केले.
असे ठराव मंजूर
फडकरी बांधवांसाठी संतपीठ निर्माण करावे. त्यांना मासिक मानधन मिळावे. भीमा, इंद्रायणी व नीरा या नदीचे पात्र प्रदूषणमुक्त करावे. आळंदी येथे वारकरी व फडकरी यांच्या जमिनीचे आरक्षण रद्द करावे. संत साहित्य संमेलनासाठी मराठी भाषा विभागाकडून कायमस्वरूपी अनुदान मिळावे, असे ठराव संत साहित्य संमेलनादरम्यान मंजूर करण्यात आले.
फोटो
२२पंढरपूर संमेलन
ओळी
संत साहित्य संमेलनातील विविध कार्यक्रमांत सहभागी झालेले महाराज मंडळी.