महाआघाडीतल्या एका पक्षाकडून पूरग्रस्तांच्या मदतीला विरोध; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 11:44 AM2020-10-21T11:44:00+5:302020-10-21T11:46:05+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकींग
सोलापूर : महाआघाडीतला एक पक्ष सहकार क्षेत्रावर वर्चस्व राखून आहे. त्याच हितसंबंधातून साखर कारखानदारांना अनुदान देण्यासाठी हा पक्ष तयारी करतोय. त्यामुळे सध्या राज्यभरातील पूरग्रस्तांना मदत मिळू नये. अनुदान मिळू नये, याकरिता महाआघाडीतला हा पक्ष त्यांच्या मित्र पक्षांवर दबाव टाकतोय, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
त्यांचा रोष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर होता. राष्ट्रवादी पक्षाचे नाव न घेता त्यांनी पूरग्रस्तांच्या विरोधात दबाव टाकणाºया तसेच सहकार हित जोपासणाºया राष्ट्रवादी पक्षावर गंभीर आरोप केला. सोलापूर जिल्ह्यात मोठी अतिवृष्टी झाली. त्यामुळे अनेक गावांमध्ये पूर आला आहे. पूरग्रस्त गावांच्या भेटीकरिता डॉ. आंबेडकर हे मंगळवारी सोलापूर दौºयावर होते. दरम्यान, त्यांनी येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या कार्यप्रणालीवर टीका केली. महाराष्ट्रातले हे सरकार तीन पायांवर चालणारे सरकार आहे. त्यातील एक पाय इतर दोन पायांवर दबाव टाकतोय. पूरग्रस्त शेतकºयांना अनुदान मिळू नये, यासाठी तो प्रयत्न करतोय, असा आरोप त्यांनी यावेळी केला.
डॉ. आंबेडकर म्हणाले, तीन पायांवर चालणाºया या सरकारात ताळमेळ नाही. त्यामुळेच पूरग्रस्तांना मदत करण्याच्या विषयावर अर्थमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यात टोलवाटोलवी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्यसनी आहेत, ते देश विकायला चाललेत. त्यांची अवस्था एका दारुड्याप्रमाणे झाली आहे.
----------
पूरग्रस्तांना तत्काळ पाच हजार रुपये द्या
आपत्तीकाळात शेतक?्यांना खावटी मदत देण्याची शासकीय पद्धत कार्यरत आहे. ज्या पूरग्रस्त शेतक?्यांचे नुकसान झालेले आहे, त्यांना शासनाकडून महिनाभर पुरेल इतकं चांगलं धान्य, कपडे, भांडीकुंडी तसेच पाच हजार रुपयांपर्यंतची रोख रक्कम तत्काळ मदत देण्याची पद्धत आहे. राज्यातील सर्व पूरग्रस्त शेतकºयांना सरसकट खावटी मदत दोन दिवसात द्यावी, अशी मागणी आंबेडकर यांनी केली.
२५ आॅक्टोबरला ऊसतोड कामगारांचा मेळावा
२५ आॅक्टोबरला बीड येथील भगवानगड पायथ्याशी ऊसतोड कामगार, मुकादम तसेच कमिशन एजंट यांचा जाहीर मेळावा घेत आहोत. पाच वर्षांपूर्वी सरकारसोबत ऊसतोड कामगारांचा करार झाला होता. करार संपला असून नवीन करार व्हायला पाहिजे. त्याकरिता हा मेळावा आयोजित केला आहे. ७ कामगार संघटनांचा यात सहभाग आहे. जाहीर मेळाव्याचे नेतृत्व मी करतोय. नवीन करार झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही; अन्यथा कामगार संपावर जाणार आहेत, अशी माहिती यावेळी आंबेडकर यांनी दिली.