भाजपविरोधी पक्षांचा दिल्लीतील शेतकरी आंदोलनास पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:25 AM2021-02-09T04:25:01+5:302021-02-09T04:25:01+5:30
कृषिसंबंधित नवीन कायदे रद्द करावेत, हमीभाव मिळण्यासाठी स्वतंत्र कायदा करावा, पेट्रोल, डिझेलचे दर कमी करावेत, रेशन व्यवस्थेचे सार्वत्रिकीकरण करावे ...
कृषिसंबंधित नवीन कायदे रद्द करावेत, हमीभाव मिळण्यासाठी स्वतंत्र कायदा करावा, पेट्रोल, डिझेलचे दर कमी करावेत, रेशन व्यवस्थेचे सार्वत्रिकीकरण करावे यासह इतर मागण्या तसेच दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सांगोला तालुका शेतकरी जनआंदोलन संघर्ष समितीतर्फे धरणे आंदोलन सुरू केले.
यावेळी ललित बाबर, बापू पोकळे, इरफान फरुखी, ॲड. बाबर आदींनी कृषी कायद्याच्या विरोधात भाजप सरकारवर टीका केली. या आंदोलनात तानाजी पाटील, ललित बाबर, प्रा. नानासाहेब लिगाडे, चंद्रकांत देशमुख, राजेंद्र पाटील, अरविंद केदार, विनोद बाबर, बापू ठोकळे, बाळासाहेब बनसोडे, इरफान फारुखी, दीपक गोडसे, चंचल बनसोडे, हमीद बागवान, ॲड. बाबर यांच्यासह शेतकरी, महिला सहभागी झाल्या होत्या.
फोटो ओळ : शेतकरी जनआंदोलन संघर्ष समितीतर्फे दिल्लीतील शेतकरी आंदोलनास पाठिंबा देऊन सांगोला तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करताना भाजपविरोधी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते.