नोटाबंदीच्या विरोधात सोलापूरात विविध पक्षांची निर्दशने, मोर्चा, आंदोलने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 11:54 AM2017-11-08T11:54:58+5:302017-11-08T11:57:51+5:30
मोदी सरकारच्या काळात झालेल्या नोटाबंदीच्या विरोधात सोलापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात विविध पक्ष व संघटनांच्यावतीने निर्दशने, मोर्चा, आंदोलन सुरू करण्यात आली आहेत़
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ८ : मोदी सरकारच्या काळात झालेल्या नोटाबंदीच्या विरोधात सोलापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात विविध पक्ष व संघटनांच्यावतीने निर्दशने, मोर्चा, आंदोलन सुरू करण्यात आली आहेत़ तर काही ठिकाणी विरोधकांच्यावतीने काळा दिवस पाळण्यात येत आहे़
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे नोटाबंदीच्या निषेधार्थ वर्षश्राध्द व पिंडदान आंदोलन सुरू आहे़ तर सोलापूर शहरात माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाच्यावतीने निर्दशने करण्यात येत आहेत़
जिल्हा मध्यवर्ती बँकेत जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजन पाटील यांनी काळी टोपी घालून नोटाबंदीचा निषेध व्यक्त केला आहे़
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीच्या निर्णयाला बुधवारी एक वर्ष पूर्ण झाले आहे़ त्यानिमित्ताने काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी ८ नोव्हेंबर हा काळा दिवस पाळण्याचे ठरविले होते़ त्यानुसार सोलापूर शहर व परिसरात विविध पक्ष व संघटनांनी काळा दिवस पाळत निर्दशने व मोर्चाचे आयोजन केले आहे़ सकाळपासून जिल्हाधिकारी कार्यालय व त्या त्या तालुक्यातील तहसिल कार्यालयासमोर निर्दशने व मोर्चा निघत आहे़ या मोर्चात भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे़