कडक निर्बंधास विरोध; व्यापाऱ्यांनी ठोठावला जिल्हाधिकाऱ्यांचा दरवाजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:26 AM2021-08-12T04:26:40+5:302021-08-12T04:26:40+5:30

निवेदनात म्हटले आहे की, दोन वर्षांपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने वेळोवेळी लागू केलेले प्रतिबंध व त्यामुळे अडचणीत आलेल्या ...

Opposition to strict restrictions; Traders knocked on the Collector's door | कडक निर्बंधास विरोध; व्यापाऱ्यांनी ठोठावला जिल्हाधिकाऱ्यांचा दरवाजा

कडक निर्बंधास विरोध; व्यापाऱ्यांनी ठोठावला जिल्हाधिकाऱ्यांचा दरवाजा

Next

निवेदनात म्हटले आहे की, दोन वर्षांपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने वेळोवेळी लागू केलेले प्रतिबंध व त्यामुळे अडचणीत आलेल्या व्यावसायिकांची आर्थिक परिस्थिती अधिकच बिकट होणार आहे. व्यवसाय बंद असले तरी बँकांचे हप्ते काही थांबलेले नाहीत. दुकानाचे भाडे, कामगारांचा पगार, लाइट बिल, वैद्यकीय खर्च व घर प्रपंचासाठी लागणारे पैसे हा खर्च काही थांबलेला नाही. यापुढे व्यवसाय बंद ठेवणे शक्य नाही. तसे झाल्यास व्यापाऱ्यांना आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी कडक निर्बंध न लावता कोरोना संसर्ग रोखण्यासाठीचे नियम पाळून दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी द्यावी, असे निवेदन व्यापारी महासंघाचे पदाधिकारी गोरख देशमुख, महेश कोठारी, परेश पाटील, मदन शहा आदींनी सोलापूर येथे जाऊन दिले.

Web Title: Opposition to strict restrictions; Traders knocked on the Collector's door

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.