अर्थसंकल्पाचे सत्ताधिकाऱ्यांकडून स्वागत, करवाढ केल्याने विरोधकांचा सभात्याग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:29 AM2021-02-27T04:29:02+5:302021-02-27T04:29:02+5:30

स्व. यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक भवन येथील सर्वसाधारण सभेत २०२०-२१ चा सुधारित आणि २०२१-२२ च्या अर्थसंकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. पीठासनाधिकारी ...

Opposition welcomes budget, raises taxes | अर्थसंकल्पाचे सत्ताधिकाऱ्यांकडून स्वागत, करवाढ केल्याने विरोधकांचा सभात्याग

अर्थसंकल्पाचे सत्ताधिकाऱ्यांकडून स्वागत, करवाढ केल्याने विरोधकांचा सभात्याग

Next

स्व. यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक भवन येथील सर्वसाधारण सभेत २०२०-२१ चा सुधारित आणि २०२१-२२ च्या अर्थसंकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. पीठासनाधिकारी नगराध्यक्ष ॲड. असिफ तांबोळी, मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील यांनी कामकाज पाहिले. मुख्य लेखापाल मि. ता. वाकडे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. वरिष्ठ लिपिक आप्पा राऊत यांनी विषयांचे वाचन केले.

सलग पाचव्या वर्षी कोणतीही करवाढ, दरवाढ न करता सादर केलेला अर्थसंकल्प आहे. नागरिकांच्या हितासाठी नगरपरिषद काम करत असल्याचे माजी नगराध्यक्ष रमेश पाटील यांनी सांगितले.

विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे म्हणाले, कोरोनाचे संकट आल्यापासून नागरिकांचे जगणे मुश्कील झाले आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्य जनता संकटात आहे, असे असताना एकीकडे करवाढ, दरवाढ नाही, असे सांगून प्रत्यक्षात बजेटमध्ये जीआयएस पध्दतीचा वापर करण्यासाठी ४ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. चतुर्थ वार्षिक कर आकारणीमध्ये घरपट्टीत भरमसाठ वाढ होणार आहे, यावरून छुप्या पध्दतीने करवाढ नागरिकांच्या माथी मारली आहे. आकडे फुगवून गोलमाल केलेला निव्वळ फसवाफसवीचा अर्थसंकल्प आहे. यास विरोध करत असल्याचे सांगत सभेतून निषेध व्यक्त करून विरोधी सोपल गटाच्या नगरसेवकांनी घोषणा देत सभेतून बाहेर जाण्याचा मार्ग अवलंबला.

कोट ::::::

हा शिलकीचा अर्थसंकल्प आहे. शहरातील सर्व विकासकामांचा यात अंतर्भाव आहे. सर्वांगीण विकासासाठी चांगले उत्पन्नाचे स्त्रोतही निर्माण करून दिले आहेत. प्रशासनाचा खुलासा न ऐकता विरोधी पक्ष मध्येच निघून गेले आहेत.

- ॲड. आसिफ तांबोळी,

नगराध्यक्ष

कोट ::::::

प्रशासन आणि पदाधिकारी ही दोन चाके असल्याने सहकार्याची अपेक्षा आहे. नागरिकांकडे नगरपरिषदेेची मोठी थकबाकी असल्याने सेवा देताना अडचणी येत आहेत. भविष्यातील जप्तीच्या कारवाया टाळण्यासाठी नगरपरिषदेस सहकार्य करावे.

- अमिता दगडे-पाटील,

मुख्याधिकारी

असा आहे अर्थसंकल्प

२०२१-२२ च्या अर्थसंकल्पातील आरंभी शिल्लक ८९ कोटी ६६ लाख ६९ हजार १४० रुपये, महसुली जमा ६० कोटी ५१ लाख ०४ हजार ३९९ रुपये आहे. भांडवली जमा २६६ कोटी ९६ लाख ९१ हजार रुपये, महसुली खर्च रु.११९ कोटी ६१ लाख ६२ हजार ८४५ रुपये आहे. भांडवली खर्च रु.२८३ कोटी ७६ लाख ८२ हजार २७० रुपये, अखेरची शिल्लक १३ कोटी ७६ लाख १९ हजार ४२४ रुपये तरतूद केली आहे.

Web Title: Opposition welcomes budget, raises taxes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.