हरकतदाराच्या अर्जासह दरखास्तीचे कामकाज चालविण्याचे आदेश; उच्च न्यायालयाचा दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:34 AM2021-02-23T04:34:29+5:302021-02-23T04:34:29+5:30
या प्रकरणी न्यायालयात याचिकाकर्ता भीमाशंकर शेटे यांच्या वतीने ॲड. सुजित बुगडे, तर सुधीर तलवाड यांच्या वतीने ॲड. सार्थक दिवाण ...
या प्रकरणी न्यायालयात याचिकाकर्ता भीमाशंकर शेटे यांच्या वतीने ॲड. सुजित बुगडे, तर सुधीर तलवाड यांच्या वतीने ॲड. सार्थक दिवाण व ॲड. आशुतोष कुलकर्णी यांनी काम पाहिले. शहरातील मध्यवर्ती भागातील पांडे चौक येथील सी.स.नं. ४२२२ या जागेत सुधीर तलवाड यांचे भगवंत कम्युनिकेशन नावाचे मोबाइलचे दुकान आहे. ही जागा शेटे यांची वडिलोपार्जित असून, भाडेकरारपत्र विजय वाई यांचे नावाने आहे. शेटे यांनी या जागेचा कब्जा मिळावा याकरिता स्थानिक न्यायालयात दावा दाखल केला होता. मात्र त्यात प्रत्यक्ष कब्जा सुधीर तलवाड यांचा होता; पण त्यांना पक्षकार केले नव्हते. त्यामुळे तळवाड यांनी ही जागा बऱ्याच वर्षांपासून भागीपत्राद्वारे माझ्या कब्जात आहे. येथे माझा व्यवसाय सुरू आहे. त्यामुळे मला पक्षकार करून माझे म्हणणे विचारात घ्यावे, अशी मागणी केली होती. मात्र ती नाकारण्यात आली.
या जागेत वाई व शेटे यांच्यात तडजोड होऊन शेटे यांनी प्रतीकात्मक कब्जा घेऊन प्रत्यक्ष कब्जा मिळविण्यासाठी दरखास्त दाखल केली होती. त्यास हरकत घेऊन तलवाड यांनी आपले म्हणणे विचारात घ्यावे त्याशिवाय त्यावर निर्णय करू नये, असा अर्ज केला. हा अर्ज वरिष्ठस्तर दिवाणी न्यायधीश संधू यांनी मंजूर केला होता. तसेच दरखास्त काढून टाकली होती. त्याविरोधात शेटे यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन पुनर्निरीक्षण याचिका दाखल केली होती. त्याची सुनावणी न्यायमूर्ती चंद्रकांत भडंग यांच्यासमोर झाली.
----