मोहोळ शौचालय घोटाळ्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश

By admin | Published: June 3, 2014 12:42 AM2014-06-03T00:42:01+5:302014-06-03T00:42:01+5:30

जि.प. सीईओ : अधिकारी, कर्मचारी अन् अनुदान घेणारेही अडकणार

Order for filing an FIR in Mohol toilet case | मोहोळ शौचालय घोटाळ्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश

मोहोळ शौचालय घोटाळ्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश

Next

सोलापूर : मोहोळ तालुक्यातील शौचालय घोटाळ्यात मोठी साखळी असून, प्राथमिक चौकशी अहवालाच्या आधारे पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे आदेश सीईओ श्वेता सिंघल यांनी दिले आहेत. यात कोण..कोण अडकलंय असे विचारल्यानंतर अधिकारी, कर्मचारी व चुकीच्या पद्धतीने शौचालयाचे अनुदान उचलणार्‍यांचाही समावेश असल्याचे सिंघल यांनी सांगितले. मोहोळ तालुक्यातील शौचालय अनुदान वाटपात मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचे उघडकीला आल्यानंतर चौकशी करण्याचे आदेश सीईओ सिंघल यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांना दिले होते. त्यांनी चौकशी सुरू करतानाच सीईओंनी अन्य अधिकार्‍यांवरही चौकशीसाठी नियुक्ती केली. त्या दोघांचेही अहवाल आले असून, त्यानुसार या प्रकरणात मोठी साखळी असल्याचे स्पष्ट झाले असल्याचे त्या म्हणाल्या. अहवालावरुन मोठ्या प्रमाणावर अपहार झाल्याचे स्पष्ट दिसत असले तरी अपहाराचा आकडा सांगता येत नसल्याचे त्या म्हणाल्या. शौचालय अनुदान वाटपात मोठ्या प्रमाणावर घोटाळा असल्याने कडक कारवाई करण्यात येणार आहे. मोहोळच्या गटविकास अधिकार्‍यांना पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे तोंडी आदेश दिले असून, लेखी पत्रही देत असल्याचे सीईओंनी सांगितले.

-----------------------------------------

सिंघल म्हणाल्या...

ही साधारण घटना नाही एक व्यक्ती नाही, यात साखळी आहे ग्रामपंचायत विभागाचा अहवाल व्यवस्थित आला नाही तुम्हाला नवनवीन ऐकायला मिळेल दोन्ही अहवालांचे निष्कर्ष एकत्रित करणार दोषी असणारा कोणी वाचणार नाही अधिकारी, कर्मचारी व चुकीच्या पद्धतीने लाभ घेणारेही दोषी

----------------------------

अधिकार्‍यांनी मानसिकता बदलावी

अधिकार्‍यांची मानसिकता चांगली नाही. सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाई असताना अधिकार्‍यांची मानसिकता बदलण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या. जलस्वराज्य टप्पा एकपेक्षा टप्पा-२ मध्ये मोठ्या प्रमाणात बदल असल्याचे सीईओ सिंघल यांनी सांगितले

. ---------------------------------

अतिरिक्त सीईओंचा पदभार सावंतांकडे

तानाजी गुरव सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांचा पदभार कोणाकडे देणार यासाठी उत्सुकता लागली होती. परंतु सेवाज्येष्ठतेनुसार महिला व बालकल्याणचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सावंत यांच्याकडे पदभार देण्यात आला असल्याचे सीईओ सिंघल म्हणाल्या.

---------------------------

माझ्यावर होणार्‍या आरोपाच्या आक्षेपाचा निषेध

. पालकमंत्री मला वडिलासारखे आहेत. मुलीला बोलल्यासारखे ते बोलले. त्याच्या आज चुकीच्या बातम्या छापून आल्या. - श्वेता सिंघल सीईओ, जि.प.

Web Title: Order for filing an FIR in Mohol toilet case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.