व्यापाऱ्यास दुप्पट रक्कम देण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:24 AM2021-02-11T04:24:10+5:302021-02-11T04:24:10+5:30
व्यापारी गफार सत्तर बागवान याने २ लाखांचा व १ लाख २५ असे दोन वेगवेगळे धनादेश दिलेले होते. ...
व्यापारी गफार सत्तर बागवान याने २ लाखांचा व १ लाख २५ असे दोन वेगवेगळे धनादेश दिलेले होते. पण ते बँकेत व्यापाऱ्याच्या खात्यावर बॅलन्स नसल्याने दोन्हीही धनादेश वठले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने दोषी धरून २ लाखांच्या चेकपोटी ६ महिन्यांचा कारावास व दुप्पट रक्कम तर दुसरा १ लाख २५ हजारांचाही चेक वठला नसल्याने ४ महिने कारावास व दुप्पट रक्कम देण्याचे आदेश दिले.
फिर्यादी वामन काटे यांनी गफार बागवान याच्याविरुद्ध माढा येथील फौजदारी न्यायालयात निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट कलम १३८ प्रमाणे फिर्याद दाखल केली होती.
त्याची सुनावणी मेहेरबान न्यायालयाचे न्या. काझी यांच्यासमोर होऊन आरोपी गफार बागवान यास दोन्ही प्रकरणी दोषी धरून नुकसानीपोटी दामदुप्पट रक्कम देण्याचे व कारावासाची वरील आदेश दिले. या प्रकरणी यातील फिर्यादीतर्फे ॲड. सोमनाथ सावंत बार्शी व ॲड. महेश जाधव यांनी काम पाहिले.