तीन वर्षापासून प्रलंबित शिष्यवृत्ती त्वरीत देण्याचे आदेश द्या! भिमशक्ती सामाजिक संघटनेची पालकमंत्र्यांकडे मागणी
By संताजी शिंदे | Updated: July 6, 2024 17:59 IST2024-07-06T17:58:52+5:302024-07-06T17:59:18+5:30
सोलापूर : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गेल्या तीन वर्षापासून प्रलंबित असलेली शिष्यवृत्ती त्वरीत आदा करण्यात यावी, यासह अन्य मागण्यांचे ...

तीन वर्षापासून प्रलंबित शिष्यवृत्ती त्वरीत देण्याचे आदेश द्या! भिमशक्ती सामाजिक संघटनेची पालकमंत्र्यांकडे मागणी
सोलापूर : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गेल्या तीन वर्षापासून प्रलंबित असलेली शिष्यवृत्ती त्वरीत आदा करण्यात यावी, यासह अन्य मागण्यांचे निवेदन भिमशक्ती सामासिक संघटनेच्या वतीने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या कार्यकाळातील सामाजिक न्याय विभागातील सर्व योजनांची अंमलबजावणी करण्यात यावी. सोलापूर शहरात जुना एम्प्लॉयमेंट चौकात आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांचा पुर्णाकृती पुतळा बसवण्यात यावा. रमाई घरकूल योजनेचा निधी प्रत्येकी १० लाख रूपये इतका वाढवण्यात यावा. परदेशी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती वाढ करण्यात येवून त्यांची संख्या वाढविण्यात यावी. कर्मवीर दादासाहेब गायकवाड योजनांची अंमलबजावणी करण्यात यावी.
राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण करण्यात यावे. शेतकऱ्यांच्या मालास हमी भाव देण्यात यावा यासह अन्य मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी भिमशक्ती सामाजिक संघटनेचे शहराध्यक्ष उमेश सुरते, जिल्हाध्यक्ष संजय रणदिवे, सरचिटणीस राजा कदम, गणेश चंदनशिवे, प्रकाश बनसोडे, के.एम. कांबळे, विक्रम वाघमारे आदी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.