कुरनूरचा विसर्ग वाढल्याने नदीकाठच्या नागरिकांना स्थलांतर करण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:24 AM2021-09-27T04:24:12+5:302021-09-27T04:24:12+5:30
अक्कलकोट : कुरनूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढत असल्याने बोरी नदीकाठच्या सर्व गावांतील नागरिकांना ताबडतोब स्थलांतरित होण्याचे आदेश तहसीलदार बाळासाहेब ...
अक्कलकोट : कुरनूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढत असल्याने बोरी नदीकाठच्या सर्व गावांतील नागरिकांना ताबडतोब स्थलांतरित होण्याचे आदेश तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांनी दिले.
पूरस्थिती पाहता स्थानिक प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी सतर्कता बाळगावी.
गरज पडल्यास नागरिकांचे स्थलांतर करून त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवावे व त्यांना वीज, पाणी, निवारा उपलब्ध करून देण्याचे आदेश तहसीलदार यांनी स्थानिक पातळीवर कर्मचाऱ्यांना दिले.
सांगवी बु आणि सांगवी खु, बोरीउमरगेसह बोरी नदीकाठच्या सर्व गावांना तहसीलदार भेटी देत आहेत.
सध्या कुरनूर धरणातून २४०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. आणखीन पाणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरपंच, उपसरपंच, सदस्य, पुढारी यांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन अक्कलकोट कार्यकारी अधिकारी तथा दंडाधिकारी तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांनी केले आहे.