‘टू प्लस’ गुन्ह्यातील आरोपी बनला सेंद्रिय शेती बागायतदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 02:43 PM2019-12-30T14:43:12+5:302019-12-30T14:45:16+5:30

गुन्हेगारीतून परिवर्तनाची वाट;  पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या उपक्रमाला यश

Organic agricultural horticulturist accused of 'two plus' crime | ‘टू प्लस’ गुन्ह्यातील आरोपी बनला सेंद्रिय शेती बागायतदार

‘टू प्लस’ गुन्ह्यातील आरोपी बनला सेंद्रिय शेती बागायतदार

Next
ठळक मुद्देवाढत्या गुन्हेगारीमुळे गुन्हेगारांची संख्या वाढत आहे़‘टू प्लस’ माध्यमातून गुन्हेगारांना या प्रवाहातून बाहेर काढण्यास मदतया उपक्रमामुळे अनेक गुन्हेगार मूळ प्रवाहात आले आहेत.

नितीन उघडे 

कामती: सलग तीन वर्षे दुष्काळसदृश परिस्थितीने शेतकºयाला अक्षरश: मेटाकुटीला आणले़ शेतकºयाची अतिशय दयनीय अवस्था झाली. अशा स्थितीत कुरुल(ता.मोहोळ) येथील प्रमोद लांडे या शेतकºयाने अवैध दारू विक्री चालू केली़ या व्यवसायातून स्वत:चा उदरनिर्वाह चालवला. परंतु पोलिसात गुन्हे दाखल झाले़ मात्र पोलिसांनी गुन्हेगारीच्या अंधार दुनियेतून प्रकाशाची वाट दाखवली़ आज सेंद्रीय शेती फुलवून इतरांसाठी मार्गदर्शक बनलेल्या एका आरोपीची ही कहाणी आहे.

प्रमोद लांडे असे गुन्हेगारी जगतातून स्वत:ला परिवर्तन करवून घेतलेल्या आरोपीचे नाव आहे़ अवैध धंदा करणे म्हणजे एक गुन्हाच़ या गुन्ह्याखाली लांडे यांच्यावर कामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर अनेक संकटे आली. पोटासाठी हाताला काम मिळत नव्हते, ना शेती करता येत होती़ अनेक प्रयत्न केले पण ते निष्फळ ठरत होते. बघता-बघता कामती पोलीस ठाण्यात दोनपेक्षा जास्त गुन्हे त्याच्यावर दाखल झाले. वारंवार पोलिसांचे बोलावणे, पकडून घेऊन जाणे अशा घटना अनेकदा घडत होत्या. 

इकडे वडिलोपार्जित ५० एकर जमीन असून त्याकडे दुर्लक्ष झाते. अवैध धंद्यामुळे जीवनाला उतरती कळा लागली. सोलापूर ग्रामीण घटकात अधीक्षक मनोज पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्हाभरातील दोनपेक्षा अधिक गुन्हे केलेल्या आरोपींची यादी तयार करून त्यांचा एक मेळावा घेतला. आरोपींना गुन्हेगारीचा मार्ग सोडून मूळ प्रवाहात आणण्याकरिता पहिले पाऊल पडले़ जर आरोपी गुन्हेगारी कृत्य चालूच ठेवेल तर त्यांच्याविरुद्ध कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचे आदेश दिले.

 कित्येक आरोपींनी गुन्हेगारीचा मार्ग सोडून स्वत:च्या वर्तणुकीत सुधारणा केली़ याच पद्धतीने कामती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुरुल (ता.मोहोळ) येथे राहणारे प्रमोद अभिमान लांडे यांचे समुपदेशन करण्यात आले़ गुुन्हेगारी मार्ग सोडून ते आता कुरुल परिसरामध्ये एक प्रगतिशील शेतकरी म्हणून उदयाला आले आहेत.

अधिकाºयांचे मार्गदर्शन, परिवर्तनाच्या जिद्दीने नवजीवन 
‘टू प्लस’ या उपक्रमांतर्गत कामती पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण उंदरे, मंदु्रप पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप धांडे यांचे मार्गदर्शन आणि त्यातच यंदा पडलेल्या समाधानकारक पावसामुळे त्यांनी स्वत:ची शेती करण्याचा निर्णय घेतला. रासायनिक खताचा जीवनावर विपरीत परिणाम होत आहे. यामुळे प्रमोद लांढे यांनी सेंद्रिय पद्धतीने शेती करायला सुरुवात केली़ सेंद्रिय पद्धतीने त्यांनी शेतात द्राक्षे, डाळिंब, ऊस पिकांची लागवड केली. सेंद्रिय शेतीसाठी लागणारे साहित्य त्यांनी पुणे येथून खरेदी केले. शेण, मलमूत्र व पाणी हे एकत्रित करून त्यांनी गोबर गॅसची निर्मिती केली. यापासून जो टाकाऊ भाग बाहेर पडतो त्यापासून पाणी तयार केले जाते. या पाण्याचा वापर आता शेतीसाठी केला. पंचक्रोशीतील शेतकºयांना आता ते सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून मार्गदर्शन करीत आहेत. 

कामती पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किरण उंदरे व मंदु्रप पोलीस ठाण्याचे संदीप धांडे यांनी मला गुन्हेगारीतून बाहेर पडून मूळ प्रवाहात येण्यासाठी मदत केली़ आता मी सेंद्रीय पद्धतीने शेती करत आहे. अधीक्षकांच्या ‘टू प्लस’ उपक्रमाचे स्वागत करतो.
-प्रमोद लांडे
सेंद्रिय शेती बागायतदार कुरुल

वाढत्या गुन्हेगारीमुळे गुन्हेगारांची संख्या वाढत आहे़ ‘टू प्लस’ माध्यमातून गुन्हेगारांना या प्रवाहातून बाहेर काढण्यास मदत होत आहे. या उपक्रमामुळे अनेक गुन्हेगार मूळ प्रवाहात आले आहेत. ही संकल्पना राबवल्याने लोकसभा व विधानसभा निवडणुका यशस्वी पार पडल्या आहेत.
- किरण उंदरे 
सहायक पोलीस निरीक्षक 
कामती पोलीस ठाणे

Web Title: Organic agricultural horticulturist accused of 'two plus' crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.