सोलापूरात २ फेबु्रवारीपासून राज्यस्तरीय सुशील करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन, अ. भा. मराठी नाट्य परिषदेचा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 04:16 PM2018-01-30T16:16:52+5:302018-01-30T16:18:47+5:30
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ३० : अ. भा. मराठी नाट्य परिषदेच्या सोलापूर शाखेतर्फे २ ते ४ फेब्रुवारी या कालावधीत सुशील करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन केले आहे. हुतात्मा स्मृती मंदिरच्या मंचावर या स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेचे उद्घाटन आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी जिल्ह्यातील आठही नाट्य परिषद शाखेच्या अध्यक्षांची उपस्थिती असणार आहे तर पारितोषिक वितरण समारंभ ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता सिनेकलावंत महेश कोठारे व आदिनाथ कोठारे यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रकाश यलगुलवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
स्पर्धेचे यंदाचे १० वे वर्ष असून गेल्या नऊ वर्षात महाराष्टÑातील अनेक उदयोन्मुख कलावंतांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. या स्पर्धांमुळे राज्यभरातील विविध सांस्कृतिक व नाट्यकलावंतांना सहभागी होता येणार आहे.
उद्घाटन समारंभास अकलूज नाट्य परिषदेचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते-पाटील, उपनगरीय शाखा सोलापूरचे अध्यक्ष विजय साळुंके, महानगर सोलापूर शाखेचे अध्यक्ष प्रा. अजय दासरी, पंढरपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. मंदार सोनवणे, मंगळवेढा शाखेचे अध्यक्ष डॉ. सुभाष कदम, सांगोला शाखेचे अध्यक्ष चेतनसिंह केदार, बार्शी शाखेचे अध्यक्ष सोमेश्वर घाणेकर यांची उपस्थिती असणार आहे.
या स्पर्धा तिन्ही दिवस सकाळी ८ वाजता सुरू होतील. या स्पर्धेमधील प्रथम क्रमांक विजेत्यास सुशील करंडक व २५ हजार रुपये रोख, प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकास स्मृतिचिन्ह व १५ हजार रुपये, प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. याशिवाय उत्कृष्ट दिग्दर्शन, उत्कृष्ट अभिनय स्त्री व पुरुष, उत्कृष्ट नेपथ्य, उत्कृष्ट प्रकाशयोजना, उत्कृष्ट पार्श्वसंगीतासाठी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. याशिवाय खास स्पर्धेसाठी लिहिलेल्या पहिल्या तीन उत्कृष्ट एकांकिकेसाठी रोख पारितोषिके व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.
पत्रकार परिषदेस विद्या काळे, अशोक शेट्टी, विठ्ठल बडगंची शांता येळंबकर, आनंद खरबस आदी पदाधिकारी उपस्थित होते.
------------------------
या एकांकिकांचे सादरीकरण
- या स्पर्धेत शुक्रवारी २ फेब्रुवारी रोजी बॅक कौन मारा?, तिनं असं का केलं ?, कँटीन, कम्पेअर, लाल काळोख, चंद्रपूरच्या जंगलात, यज्ञाहुती, माझं नाव अविनाश आचार्य, मित्तर, खटारा, शोध, बिटवीन द लाईफ या एकांकिका सादर होतील.
- शनिवारी ३ फेब्रुवारी रोजी अॅनिमल प्लॅनेट, भर चौकात गांधी पुतळ्यासमोर, अर्धवट गोष्ट, सूरज के बुलंद हौसले, ट्रॅफिक, तस्करी, दिमडी, लूजर्स, सेकंड चान्स, धसकट, बीर्इंग अॅन्ड नथिंग, वॉर आॅफ डीजे, टरफल व चंडप्रचंड
- रविवारी ४ फेब्रुवारी रोजी अफू, बयाबा, लागण, अरफान्स, कपान, मिसिंग, जर्नी, छुटा छेडा, अभंग, बीपी, तेरे मेरे सपने या एकांकिका सादर होणार आहेत.