इस्रायलच्या सहकार्यातून उस्मानाबाद, यवतमाळात ‘मोशाव’ मॉडेलची शक्यता, अनय जोगळेकरांची माहिती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 07:11 PM2017-11-04T19:11:29+5:302017-11-04T19:13:38+5:30

इस्रायलच्या सहकार्यातून महाराष्टÑातील उस्मानाबाद आणि यवतमाळ जिल्'ात ‘मोशाव’ अर्थात सामाजिक शेतीचा प्रकल्प सुरू करण्यासाठी राज्य सरकार इच्छुक आहे.

Osmanabad, Yavatmal's possibility of 'Masha'av model, and other Joglekar's information with Israel | इस्रायलच्या सहकार्यातून उस्मानाबाद, यवतमाळात ‘मोशाव’ मॉडेलची शक्यता, अनय जोगळेकरांची माहिती 

इस्रायलच्या सहकार्यातून उस्मानाबाद, यवतमाळात ‘मोशाव’ मॉडेलची शक्यता, अनय जोगळेकरांची माहिती 

Next
ठळक मुद्देतिबक्समध्ये गावाच्या मालकीची एकत्रित जमीन असतेइस्राईलचा प्रदेश सोलापूर, मराठवाड्यासारखा कमी पर्जन्यमानाचा आहे राज्यात चार कृषी गुणवत्ता केंद्र 


गोपालकृष्ण मांडवकर
सोलापूर दि ४ : इस्रायलच्या सहकार्यातून महाराष्टÑातील उस्मानाबाद आणि यवतमाळ जिल्'ात ‘मोशाव’ अर्थात सामाजिक शेतीचा प्रकल्प सुरू करण्यासाठी राज्य सरकार इच्छुक आहे. यापैकी यवतमाळ जिल्'ात यासाठी पोषक वातावरण असून, आता राज्य सरकारच्या पुढाकारावर पुढची दिशा अवलंबून असल्याची माहिती इस्रायलच्या दूतावासात राजकीय संबंध विशेष प्रकल्प अधिकारी असलेले अनय जोगळेकर यांनी दिली.
सोलापुरातील एका कार्यक्रमासाठी आले असता ‘लोकमत’ला त्यांनी विशेष मुुलाखत दिली. ते म्हणाले, इस्रायलमध्ये १९५० च्या दशकापासून सहकारावर आधारित तिबक्स आणि मोशाव या दोन पद्धतीची शेती केली जाते. तिबक्समध्ये गावाच्या मालकीची एकत्रित जमीन असते, तर मोशावमध्ये प्रतिमाणसी एक ते दीड एकर जमीन असते. उस्मानाबाद आणि यवतमाळ या दोन जिल्'ात प्रतिमाणसी शेती कमी असल्याने मोशाव पद्धत विकसित केली आहे. २०१५ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इस्रायलला आले असता त्यांनी हे मॉडेल पाहिले. उस्मानाबाद आणि यवतमाळपैकी यवतमाळ जिल्'ात फॅमिली फार्मिंग आणि इरिगेशनच्या केंद्र उभारणीसाठी चर्चा सुरू आहे. राज्य सरकारने यासाठी पुढाकार घ्यावा, अशी विनंती आहे. या प्रकल्पातून पायाभूत सुविधांवर भर देण्याचा प्रयत्न असेल, असे ते म्हणाले.
इस्राईलचा प्रदेश सोलापूर, मराठवाड्यासारखा कमी पर्जन्यमानाचा आहे. मात्र ८५ टक्के सांडपाणी प्रक्रिया करून शेतीला दिले जाते. भारतात मुबलक सांडपाणी असूनही ते वापरले जात नाही. ठिबक सिंचनासारख्या पद्धतीचा आणि आता त्याही पुढे जावून ड्रोन कॅमेराच्या आणि सॅटेलाईटच्या माध्यमातून आवश्यक त्याच झाडाला गरजेपुरते पाणी देण्याचे तंत्र इस्राईलने अंमलात आणले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्राईलला दिलेल्या भेटीदरम्यान हे तंत्र पाहिले आहे. भारत, चीन, जपान या देशांनी गुंतवणूक करावी आणि एकत्रित उत्पादन विकसित करून ते जगभर विकावे, असे हे मॉडेल आहे. टाटा, महेंद्रा, अदानी या सारख्या उद्योगांनी यात गुंतवणूक केली आहे.
-----------
 राज्यात चार कृषी गुणवत्ता केंद्र 
इस्राईलच्या भारतासोबत सहकार्यात शेती हा महत्वाचा भाग आहे. या दोन देशांच्या संयुक्त भागीदारीतून भारतातील नऊ राज्यात २६ कृषी गुणवत्ता केंद्र उभारले आहेत. यात महाराष्टÑात चार केंद्रांचा समावेश असून दापोली (हापूस), राहुरी (डाळींब), औरंगाबाद (केसर) आणि नागपूर (संत्री) या केंद्रांचा समावेश आहे. या पाच केंद्रांसह आता यवतमाळचाही विचार सुरू आहे.
 

Web Title: Osmanabad, Yavatmal's possibility of 'Masha'av model, and other Joglekar's information with Israel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.