अस्थींचे चंद्रभागेत विसर्जन

By Admin | Published: June 16, 2014 01:17 AM2014-06-16T01:17:28+5:302014-06-16T01:17:28+5:30

मुंडेसाहेब अमर रहे : असंख्य कार्यकर्त्यांनी घेतले अस्थिकलशाचे दर्शन

Osteoporosis | अस्थींचे चंद्रभागेत विसर्जन

अस्थींचे चंद्रभागेत विसर्जन

googlenewsNext


सोलापूर : ‘अमर रहे अमर रहे गोपीनाथ मुंडे अमर रहे’ अशा घोषणा देत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अस्थिकलशाचे रविवारी सोलापुरातील असंख्य चाहत्यांनी व कार्यकर्त्यांनी दर्शन घेतले़ सोलापुरातून दुपारी हा अस्थिकलश मोहोळमार्गे पंढरपुरात नेण्यात आला आणि सायंकाळी साडेपाच वाजता चंद्रभागा नदीत या अस्थिकलशाचे विसर्जन करण्यात आले़
भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचा अस्थिकलश रविवारी सकाळी सिध्देश्वर एक्स्प्रेसने आ़ विजयकुमार देशमुख, अशोक निंबर्गी, अशोक कटके, संजय कोळी, राजू पाटील यांनी आणला़ त्यानंतर हा अस्थिकलश नवीपेठेतील आमदार विजयकुमार देशमुख यांच्या संपर्क कार्यालयासमोर दर्शनासाठी दुपारी अडीचपर्यंत ठेवण्यात आला होता़ महापौर अलका राठोड, आ़ दिलीप माने, आ़ सिद्रामप्पा पाटील, माजी आमदार भाई एस़एम़ पाटील, माजी आमदार नरसिंग मेंगजी, शिवसेनेचे शहरप्रमुख प्रताप चव्हाण, सहसंपर्कप्रमुख पुरुषोत्तम बरडे, विष्णू कारमपुरी आदींनी अस्थिकलशाचे दर्शन घेतले़
अस्थिकलशाच्या दर्शनासाठी पिंटू महाले, चन्नवीर चिट्टे, विक्रम देशमुख, प्रशांत फत्तेपूरकर, अमर पुदाले, संजय वाघमारे, संजय क्षीरसागर, बाबूराव घुगे, काशिनाथ थिटे, बाबा बडवे आदी उपस्थित होते़ दुपारी अडीच वाजता हा अस्थिकलश मोहोळला नेण्यात आला़ तेथे अर्धा तास दर्शनासाठी ठेवण्यात आला होता़ त्यानंतर पंढरपुरात नेऊन सायंकाळी साडेपाच वाजता अस्थिकलशाचे आ़ विजयकुमार देशमुख यांच्यासह अनेक चाहत्यांच्या उपस्थितीत विसर्जन करण्यात आले़
धर्मपुरीत दुसरा अस्थिकलश
भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचा दुसरा अस्थिकलश मुंबईहून माजी खासदार सुभाष देशमुख यांनी धर्मपुरी येथे रविवारी सकाळी आणला होता़ त्यावेळी त्यांच्या समवेत राजकुमार पाटील, शहाजी पवार , सचिन कल्याणशेट्टी, संजय कोकाटे आदी उपस्थित होते़ धर्मपुरी, नातेपुते, सदाशिवनगर, माळशिरस, वेळापूर आदी ठिकाणी हा अस्थिकलश दर्शनासाठी ठेवला़ दुपारी अडीच वाजता तो पंढरपुरात आणला़ चौपाडमध्ये दर्शनासाठी ठेवण्यात आला़ यावेळी प्रशांत परिचारक यांच्यासह महायुती व विविध पक्षांच्या नेत्यांनी दर्शन घेऊन मुंडे यांना श्रध्दांजली वाहिली़ शेकडो कार्यकर्त्यांनी मुंडे यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेऊन श्रध्दांजली वाहिली़ तेथून रथामध्ये अस्थिकलशाची मिरवणूक काढून चंद्रभागेत अस्थींचे विसर्जन केले़ यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी मुंडे साहेब अमर रहेच्या घोषणा दिल्या़
---------------------------------------------------
भाजपामध्ये अशीही दुफळी....
मुंडे हयात असल्यापासून ते त्यांचे निधन झाल्यापर्यंत आणि त्यांना श्रध्दांजली वाहण्यापासून ते अस्थींचे विसर्जन करण्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी भाजपमधील गटबाजी दिसून आली़ श्रध्दांजलीच्या कार्यक्रमात गटतटाने कार्यक्रम राबवून सर्वपक्षीय श्रध्दांजलीस स्वरुप दिले़ प्रत्यक्षात चित्र वेगळे होते़ मुंडेंच्या अस्थींचे विसर्जन शहर भाजप कार्यकर्त्यांनी शहराच्या जवळपास म्हणजेच दक्षिण सोलापुरातील नदीकाठी करावे असे ठरले होते तर ग्रामीण भाजपाने पंढरीत अस्थी विसर्जन करण्याचे ठरले होते मात्र दोघांनीही पंढरीत अस्थी विसर्जन केले़ मुंडेंना श्रध्दांजली वाहणे असो की त्यांच्या अस्थींचे विसर्जन असो प्रत्येक ठिकाणी शिस्तबध्द समजल्या जाणाऱ्या भाजपमध्ये दुफळी दिसली़

Web Title: Osteoporosis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.