अन्यथा मंगल कार्यालय, हॉटेलना १0 हजार दंड व महिनाभर लागणार कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 09:19 AM2021-02-20T09:19:00+5:302021-02-20T09:19:26+5:30

नवी नियमावली लागू: कोरोना संसर्ग टाळण्यासाठी मोर्चा, सभांना बंदी

Otherwise, Mars office, hotel will be fined Rs 10,000 and locked for a month | अन्यथा मंगल कार्यालय, हॉटेलना १0 हजार दंड व महिनाभर लागणार कुलूप

अन्यथा मंगल कार्यालय, हॉटेलना १0 हजार दंड व महिनाभर लागणार कुलूप

googlenewsNext

सोलापूर : शहरातील कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी महापालिकेने मंगलकार्यालय, हॉटेल, जीम, बागा, कोचिंग क्लास व दुकानांमध्ये नियमापेक्षा जास्त गर्दी आढळल्यास दंड व एक महिन्यासाठी दुकानाला सील ठोकण्याचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर मिरवणुका, यात्रा, स्पर्धा, मोर्चा उपोषण व सामुहिक कोणत्याही कार्याक्रमाला बंदी घालण्यात आली आहे. 


महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी शुक्रवारी रात्री उशिरा कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये नवे निर्बंध लागू केले आहेत. मंगलकार्यालयात होणाºया लग्न व इतर समारंभाची विभागीय कार्यालयाने दररोज तपासणी करावी. लग्नाला परवाना बंधनकारक असून, ५0 लोकच आहेत की नाही याची खातरजमा करावी. नियमांचे उल्लंघन आढळल्यास नोटीसा देऊन १0 हजार दंड करावा. दुसºयांदा नियमांचे उल्लंघन झाल्यास मंगलकार्यालय महिन्यासाठी सील करावे असे आदेश दिले आहेत. कोंचींग क्लासलाही हा नियम लागू करण्यात आला आहे. 


बाजार समिती, मंडई, माल्स, शॉपिंग सेंटरमधील दुकानदार, फेरीवाल्याना कोरोना चाचणी बंधनकारक असेल व त्यांनी मास्क, फिजिकल डिटस्टन्सचे पालन करणे बंधनकारक असेल. ज्या ठिकाणी उल्लंघन दिसेल त्यांना दोन हजार दंड व दुसºया वेळेस प्रकार आढळल्यास दुकान एक महिन्यासाठी सील करण्यात येईल. त्याचबरोबर दररोज रेल्वे, बसस्थानक, जीम, उद्यान, क्रीडा स्पर्धांची मैदाने, चित्रपटगृह, हॉटेल, बारची तपासणी करण्यात येईल. जेथे नियमांचे उल्लंघन आढळेल त्यांना १0 हजार दंड व दुसºयावेळेस महिन्यासाठी आस्थापना बंद करण्यात येईल.  लहान मुले व ज्येष्ठांनी घरातच रहावे. 


सिद्धेश्वर मंदिरात ५00 जणांना प्रवेश

मिरवणुका, स्पर्धा, यात्रा, मोर्चा, उपोषण व इतर सामुहिक कार्यक्रमास बंदी असेल. पार्थनास्थळे, मंदिर, चर्चमधील दैनंदिन धार्मिक कार्यक्रम सुरू असतील.श्री सिद्धेश्वर मंदिरात दररोज ५00 भाविकांना प्रवेश देण्यास परवानगी असेल तर मठांमध्ये २0 जणांना परवनगी असेल. शासकीय कार्यालयातही गर्दी करता येणार नाही. निवेदनासाठी फक्त ५ व्यक्तींना परवानगी असेल. संबंधीत विभागाचे अधिकारी दररोज या नियमांची तपासणी करून कारवाई करतील. 


दवाखान्याची होणार तपासणी

सर्व खाजगी दवाखान्याची तपासणी होणार आहे. अशा दवाखान्यात सर्दी, पडसे, खोकल्याची लक्षणे असलेल्या रुग्णाची चाचणी करण्यात येईल. कोव्हीड सेंटरमधील व्हेंटीलेटर तयारी व इतर सुविधांची पाहणी करण्यात येईल. संपर्कातील व्यक्तींची तपासणी कडकपणे करण्यात येईल.

Web Title: Otherwise, Mars office, hotel will be fined Rs 10,000 and locked for a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.