कोरानाबाधित ११४२ पैकी १५० गावे झाली कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:17 AM2021-05-29T04:17:47+5:302021-05-29T04:17:47+5:30

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात सर्वाधिक उद्रेक झाला आहे. त्यात हायवेवरील गावांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून ...

Out of 1142 villages affected by Korana, 150 villages became Korana-free | कोरानाबाधित ११४२ पैकी १५० गावे झाली कोरोनामुक्त

कोरानाबाधित ११४२ पैकी १५० गावे झाली कोरोनामुक्त

Next

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात सर्वाधिक उद्रेक झाला आहे. त्यात हायवेवरील गावांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आल्याने ही गावे हॉटस्पॉट ठरली आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी शंभराहून अधिक रुग्ण असलेल्या गावातील सरपंच, ग्रामसेवक व तलाठ्यांना सक्त सूचना देऊन आरोग्य विभागाच्या माध्यमातून ‘होम टू होम’ नागरिकांच्या चाचण्यांवर जोर दिला. तर ५० पेक्षा जास्त, त्यापेक्षा कमी व २५ पेक्षा जास्त रुग्ण आढळलेल्या गावांची यादी तयार करून पोलिसांना देण्यात आली. त्या ठिकाणी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई वाढविली आहे. अक्‍कलकोट तालुक्‍यात १३२ गावे असून, त्यापैकी समर्थनगर आणि कडबगाव याशिवाय अन्य कोणत्याही गावांत मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळले नाहीत.

शंभराहून अधिक कोरोनाबाधित रुग्णसंख्या असलेल्या गावांची संख्या पंढरपूर (४७) तालुक्यात सर्वाधिक आहे. त्यानंतर माळशिरस तालुक्यात ३२, माढा तालुक्यात २१, उत्तर सोलापूर तालुका नऊ अशी गावांची संख्या आहे.

१००हून अधिक कोरोनाबाधित तालुकानिहाय गावे

पंढरपूर तालुका : पंढरपूर, गादेगाव, उपरी, कोर्टी, तिसंगी, वाखरी, सोनके, खेड भाळवणी, शिरढोण, कौठाळी, चळे, गोपाळपूर, मुंडेवाडी, तावशी, एकलासपूर, सिद्धेवाडी, खर्डी, टाकळी लक्ष्मी, बोहाळी, शेटफळ, तन्हाळी, तुंगत, मगरवाडी, तारापूर, सुस्ते, शेगाव दुमाला, अजनसोंड, देगाव, रोपळे, आढीव, गुरसाळे, होळे, खेडभोसे, भोसे, मेंढापूर, पांढरेवाडी, भनवळी, जैनवाडी, पळशी, पिराचीकुरोली, भंडीशेगाव, शेळवे, रांझणी, ओझेवाडी, सरकोली, आंबे, फुलचिंचोली, करकंब.

माळशिरस तालुका : यशवंतनगर, माळशिरस, माळीनगर, माळेवाडी, शिंदेवाडी, निमगाव, संग्रामनगर, सदाशिवनगर, वेळापूर, नातेपुते, अकलूज, गुरसाळे, बोरगाव, मांडवे, महाळूंग, लवंग, कारूंडे, इस्लामपूर, पिसेवाडी, जाबूंड, मोरोची, तांदुळवाडी, पानीव, पिलीव, पिंपरी, संगम, चाकोरे, खंडाळी, दहिगाव, फोंडशिरस, धर्मपुरी, श्रीपूर.

माढा तालुका : भोसरे, मानेगाव, दारफळ, निमगाव मा., उपळाई बु., उपळाई खुर्द, मोडनिंब, बैरागवाडी, तुळशी, अरण, भुताष्टे, परिते, वरवडे, पिंपळनेर, निमगाव टेंभुर्णी, कुर्डू, टेंभुर्णी, अकोले खु., कन्हेरगाव, रांझणी, माढा.

उत्तर सोलापूर तालुका - बीबीदारफळ, नान्नज, वडाळा, कळमण, पाकणी, कोंडी, मार्डी, तिऱ्हे, हिप्परगा.

सांगोला तालुका - सांगोला शहर, वाटंबरे, यलमार मंगेवाडी, कडलास, महूद, जवळा,

मोहोळ तालुका : आष्टी, पेनूर, खंडाळी, शेटफळ, अनगर, मोहोळ.

दक्षिण सोलापूर तालुका : मंद्रूप, होटगी,

मंगळवेढा तालुका : मारापूर, पाटकूल, भोसे, बोराळे, दामाजीनगर, मरवडे,

करमाळा तालुका : करमाळा शहर ,देवळाली, वीट.

बार्शी तालुका : वैराग, पांगरी, बावी

Web Title: Out of 1142 villages affected by Korana, 150 villages became Korana-free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.