सोलापूर जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानासाठी आलेल्या १४ कोटी पैकी फक्त ५ कोटी खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 02:30 PM2018-11-06T14:30:08+5:302018-11-06T14:32:15+5:30

जलयुक्त शिवार अभियान: ६८१ कामांचे केले होते नियोजन

Out of 14 crore out of 14 crore for the Jaltik Shivar campaign in Solapur district, only 5 crore | सोलापूर जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानासाठी आलेल्या १४ कोटी पैकी फक्त ५ कोटी खर्च

सोलापूर जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानासाठी आलेल्या १४ कोटी पैकी फक्त ५ कोटी खर्च

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हा नियोजन समितीकडून मिळणाºया निधीतून ९३ कामांचे नियोजन ६८२ कामांसाठी ४२ कोटी ४४ लाख खर्चाचा आराखडा तयारशासनाकडून जलयुक्त शिवार अभियानात ५८२ कामांचे नियोजन

सोलापूर: जलयुक्त शिवार अभियानासाठी शासनाकडून झेडपीला १४ कोटी २0 लाख रुपये अनुदान आले; मात्र त्यातील केवळ ५ कोटी ६९ लाख खर्च झाले आहेत. 

झेडपीने सन २0१७-१८ मध्ये जलयुक्त शिवार अभियानांतर्गत विविध ६८२ कामांसाठी ४२ कोटी ४४ लाख खर्चाचा आराखडा तयार केला आहे. यासाठी शासनाकडून जलयुक्त शिवार अभियानात ५८२ कामांचे नियोजन केले आहे. या कामांसाठी शासनाकडून ३५ कोटी ३६ लाखांचा निधी अपेक्षित असून यातील फक्त ७ कोटी ४७ लाख रुपये अनुदान मिळाले आहे.

यातून पाझर तलाव दुरुस्तीची : २0१ कामे (अपेक्षित खर्च :१५ कोटी ४४ लाख) , गाव तलाव दुरुस्तीची २६ कामे (खर्च : १ कोटी  ८0 लाख), कोल्हापूर पद्धतीचे बंधारे दुरुस्ती: ५५ कामे (खर्च: २  कोटी ९ लाख), सिमेंट बंधारे दुरुस्ती: ११ कामे (खर्च: ३३ लाख), सिमेंट बंधारे रिचार्ज: १0६ कामे (खर्च: १0 कोटी २१ लाख), नाला खोलीकरण व रुंदीकरण २७ रुपये प्रति घन मीटरप्रमाणे: १८३ कामे (५ कोटी ३७ लाख).

जिल्हा नियोजन समितीकडून मिळणाºया निधीतून ९३ कामांचे नियोजन केले आहे. यासाठी ६ कोटी ९0 लाख रुपये निधी अपेक्षित असून, त्यातील ६ कोटी ४७ लाख रुपये मिळाले आहेत. सुचविलेल्या कामांमध्ये पाझर तलावाची कामे: ५, नाला खोलीकरण व सिमेंट बंधारे: ४, सिमेंट बंधारे: ४६, नाला खोलीकरण: ३८ कामांचा समावेश आहे. झेडपीच्या उपकरातून ९९ कामे घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी ७ कोटी १८ लाखांचा खर्च अपेक्षित असून, ६ कोटी ७३ लाख निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यातून पाझर तलाव व गाव तलाव दुरुस्तीचे  प्रत्येकी एक काम, सिमेंट बंधारे व कोल्हापूर पद्धतीचे बंधारे दुरुस्तीचे प्रत्येकी दोन कामे हाती घेण्यात आली आहेत. 

असा झाला खर्च
- जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २0१७-१८ मध्ये ३ कोटी १९ लाख तर सन २0१८-१९ मध्ये २ कोटी ५0 लाख रुपये खर्च झाले आहेत. यात ५१ कामे पूर्ण झाली असून, ४0१ कामे सुरू आहेत. २२९ कामे प्रगतिपथावर असून कामाच्या टक्केवारीप्रमाणे बिल काढण्याचे काम सुरू आहे. ६८१ कामांची वर्कआॅर्डर झालेली आहे. उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, काम पूर्ण झाल्यावर बिले खर्ची टाकण्यात येणार असल्याचे सीईओ.डॉ.भारूड यांनी सांगितले.

Web Title: Out of 14 crore out of 14 crore for the Jaltik Shivar campaign in Solapur district, only 5 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.