सोलापूर जिल्ह्यात कर्जमाफीच्या यादीतून ३८ हजार शेतकरी बाहेर, जिल्हा मध्यवर्ती बँक : बँक व शासन लावतेय निकषाची चाळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 12:29 PM2018-02-08T12:29:22+5:302018-02-08T12:31:16+5:30
कर्जमाफीसाठीच्या ‘यलो’ व मिसमॅच(विसंगत) यादीतील ५८ हजार १५१ पैकी ३७ हजार ८५७ शेतकरी शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेसाठी अपात्र झाले आहेत.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ७ : कर्जमाफीसाठीच्या ‘यलो’ व मिसमॅच(विसंगत) यादीतील ५८ हजार १५१ पैकी ३७ हजार ८५७ शेतकरी शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेसाठी अपात्र झाले आहेत. आॅनलाईन अर्ज भरलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या दोन लाख ६५ हजार ९४ शेतकºयांपैकी ओटीएस (दीड लाखावरील थकबाकीदारासह) एक लाख १४ हजार ४७३ शेतकरी बँकेने कर्जमाफीसाठी पात्र केले असले तरी शासनाच्या तपासणीत ही संख्या कमी होण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत जिल्हा बँकेला तीन प्रकारच्या दोन लाख ६५ हजार ९४ शेतकºयांच्या याद्या आल्या आहेत. यापैकी ग्रीन यादीत ९५ हजार १७९ शेतकरी बसले असून हे सर्व शेतकरी कर्जमाफीला पात्र झाले आहेत. यापैकी ५१ हजार ७७५ शेतकºयांच्या खात्यावर पैसे जमा झाल्याने हे शेतकरी कर्जमुक्त झाले आहेत. त्यानंतर बँकेला ‘यलो’ यादी आली. या यादीच्या बँकेने केलेल्या तपासणीत ३२२४ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र झाले असून ६ हजार ९१६ शेतकरी अपात्र झाले आहेत. आता पात्र झालेल्या शेतकºयांची यादी शासनाकडे गेली असून या यादीच्या शासनाच्या तपासणीत पुन्हा पात्र किंवा अपात्र अशा दोन याद्या होणार आहेत.
शासनाने पुन्हा मिसमॅच (शेतकºयांची आॅनलाईन अर्जात भरलेली माहिती व बँकेकडील माहिती विसंगत) च्या दोन याद्या दिल्या असून पहिल्या यादीत ४७ हजार ११ व दुसºया यादीत १० हजार ६०७ शेतकºयांची नावे आहेत. पहिल्या ४७ हजार ११ शेतकºयांची बँक पातळीवर तपासणी झाली असून त्यापैकी १६ हजार ७० शेतकरी पात्र तर ३० हजार ९४१ शेतकरी अपात्र झाले आहेत.
--------------------
शासनाच्या चाळणीतून पात्र किती?
- ग्रीन यादीतील बँकेने त्रुटी पूर्ण केलेल्या २८ हजार ३७० शेतकºयांची यादी शासनाकडे गेली आहे. या यादीतील शेतकरी शासन पातळीवर पात्र की अपात्र हे शासनाकडून समजले नाही कारण यादीही परत आली नाही व पैसेही आले नाहीत.
- त्यानंतर ‘यलो’ यादीतील १० हजार १४० पैकी बँकेच्या तपासणीत पात्र झालेली ३२२४ शेतकºयांची यादी शासनाकडे गेली असून यावरही शासनाने कळविले नाही.
- मिसमॅच यादीतील बँकेने पात्र केलेली १६ हजार ७० व उर्वरित १० हजार ६०७ शेतकºयांच्या यादीच्या तपासणीत पात्र होणारी यादी शासनाकडे जाणार आहे.
- यलो व मिसमॅच यादीतील पात्र शेतकºयांच्या शासन पातळीवरील चाळणीतून किती शेतकरी पात्र होणार?, हे सांगणे कठीण आहे.
- यलो यादीतील ६ हजार ९१६ व मिसमॅच यादीतील सध्या झालेले ३० हजार ९४१ व उर्वरित १० हजार ६०७ शेतकºयांच्या तपासणीत अपात्र होणाºया शेतकºयांना विभागीय व जिल्हास्तरीय समितीकडे न्याय मागण्याचा अधिकार आहे.