पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:23 AM2020-12-06T04:23:38+5:302020-12-06T04:23:38+5:30
घरकुलांची कामे रखडली मंगळवेढा : तालुक्यात प्रत्येक गावात घरकुले मंजूर झाली आहेत; मात्र त्याचे बांधकाम करण्यासाठी अजूनही वाळू उपलब्ध ...
घरकुलांची कामे रखडली
मंगळवेढा : तालुक्यात प्रत्येक गावात घरकुले मंजूर झाली आहेत; मात्र त्याचे बांधकाम करण्यासाठी अजूनही वाळू उपलब्ध झाली नाही. कोठून तरी वाळू उपलब्ध करून बांधकाम सुरू करावे म्हटले तर वाळूचे दर अव्वाच्या सव्वा आकारले जात आहेत. तसेच बांधकामासाठी लागणाऱ्या सर्वच साहित्यांचे दर वाढलेले आहेत. त्यामुळे घरकुलांची कामे रखडल्याचे लाभार्थी सांगत आहेत. तरी प्रशासनाने किमान वाळू तरी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी होऊ लागली आहे.
निराधारांचे अनुदान मिळेना
मोहोळ : शासनाच्या वतीने निराधारांना विविध योजनेद्वारे अनुदान दिले जाते; मात्र गेल्या दोन-तीन महिन्यांपासून अनुदान मिळाले नाही. त्यामुळे निराधारांचे हाल सुरू आहेत. अतिवृष्टी, कोरोनामुळे कामे बंद आहेत. काही ठिकाणी मुलेही सांभाळ करीत नाहीत. अशा निराधारांचे खूपच हाल सुरू आहेत. त्यामुळे निराधारांचे अनुदान लवकर बँक खात्यावर जमा करावे, अशी मागणी निराधारांमधून होत आहे.
ज्वारी पिकांत मशागत सुरू
मंगळवेढा : यावर्षी सतत पाऊस पडल्यामुळे जमिनीत ओल कायम राहिली. त्यामुळे तालुक्यात रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा, गहू या पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणात झाली आहे. पेरणीला विलंब झाला असला तरी सध्याच्या वातावरणामुळे पिके जोमात आहेत. शिवाय शेतकरी पिकांत बैलाच्या सहाय्याने अंतर्गत मशागत करण्यात व्यस्त आहेत. तसेच यासाठी मजुरांना मजुरी मिळत असल्याचे मजुरांनी सांगितले.