मोहोळ शहरात भटक्या कुत्र्यांमध्ये खरुजचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:33 AM2021-02-23T04:33:55+5:302021-02-23T04:33:55+5:30
मोहोळ : शहरातील गल्लीबोळात रात्री अपरात्री गस्त घालत भाकरीच्या तुकड्याला जागत पहारा देणा-या भटक्या कुत्र्यांमध्ये बदलत्या वातावरणामुळे खरुज ...
मोहोळ :
शहरातील गल्लीबोळात रात्री अपरात्री
गस्त घालत भाकरीच्या तुकड्याला जागत पहारा देणा-या भटक्या कुत्र्यांमध्ये बदलत्या वातावरणामुळे खरुज नावाचा रोग पसरला आहे . त्या मुळे भटक्या कुत्र्यांचा दुर्दैवी मृत्यू होत आहे. ही बाब लक्षात येताच माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी पशुवैद्यकीय विभागाचे पथक घेऊन भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांना लस देऊन औषध उपचाराला सुरुवात केली आहे.
बंगल्याच्या संरक्षणासाठी सांभाळलेल्या पाळीव कुत्र्यावर मालक उपाययोजना करू शकतात. परंतू भटक्या कुत्र्यांच्या वेदनांचे काय ?
असा प्रश्न लक्षात घेऊनच त्यांच्यावर योग्य ते औषध उपचार करून त्यांना जीवनदान देण्याची आगळी वेगळी मोहीम रमेश बारसकर यांनी हाती घेतली आहे. शहरात भटक्या कुत्र्यांना रोग झाल्याची बाब निर्दशनास येताच बारसकर यांनी येथील पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधला . या आजारावर काय उपाययोजना करता येईल या संदर्भात चर्चा केली . डॉक्टरांच्या चर्चेतून त्यांना लसून देऊन आजार आटोक्यात आणण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी लागणारी जाळी तयार करून रविवारी सकाळी ७ ते ८ कुत्र्यांना पकडून त्यांच्यावर औषधोपचार करुन सोडून दिले. या कुत्र्यांना उपचार करुन सोडुन देताना त्याना रंग लावण्यात आला. जेणेकरून दुस-या दिवशी लक्षात यावे.
या मोहीमे वेळी माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर , येथील पशू वैधकीय दवाखान्याचे सहाय्यक डॉ. विशाल कुंभार, डॉ. प्रवीण साठे, विठ्ठल लवटे, नगरसेवक अतूल क्षीरसागर, शिलवंत क्षीरसागर ,सोमनाथ भालेराव, सुलतान पटेल, बाळासाहेब माळी, सिद्धार्थ एकमल्ले, सुधाकर सोनटक्के उपस्थित होते.
---
बदलत्या वातावरणामुळे खरुज नावाचा रोग पसरला आहे .२१ रोजी ७ ते ८ कुत्र्यांवर औषधोपचार करण्यात आले आहे. ही मोहीम दोन दिवस राबविली जाणार आहे.
- डॉ. विशाल कुंभार
सहायक पशू वैधकीय अधिकारी
----
फोटो : २१ मोहोळ
भटक्या कुत्र्यांमध्ये खरुजचा प्रादुर्भाव झाला असून त्यांना लस देऊन औषधोपचार करताना नगराध्यक्ष रमेश बारसकर, डॉ. विशाल कुंभार, डॉ. प्रवीण साठे, विठ्ठल लवटे,